‘स्वच्छ भारत’ अंतर्गत राज्यात हीरक महोत्सवी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 03:26 PM2020-03-03T15:26:31+5:302020-03-03T15:26:45+5:30

शासनाच्या निर्देशांचे महापालिका कितपत पालन करतात, हे लवकरच दिसून येणार आहे.

Diamond Festival Expedition in the State under 'Swachh Bharat' | ‘स्वच्छ भारत’ अंतर्गत राज्यात हीरक महोत्सवी अभियान

‘स्वच्छ भारत’ अंतर्गत राज्यात हीरक महोत्सवी अभियान

googlenewsNext

अकोला : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत घनकचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी नगर विकास विभागाने आता १ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत राज्यात ‘हीरकमहोत्सवी अभियान’ राबविण्याचे निर्देश जारी केले आहेत. या कालावधीत घनकचºयाचे ओला व सुका असे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध उपाय सुचिविले आहेत. शासनाच्या निर्देशांचे महापालिका कितपत पालन करतात, हे लवकरच दिसून येणार आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात उघड्यावर शौच करणाºया नागरिकांचा शोध घेऊन त्यांना वैयक्तिक स्तरावर शौचालय बांधून देण्याचे महापालिकांना केंद्र व राज्य शासनाचे निर्देश होते. शौचालय बांधून देण्याच्या बदल्यात केंद्र, राज्य व स्वायत्त संस्थांनी पात्र लाभार्थींना अनुदान दिले. २०१५ ते २०१७ या कालावधीत शौचालय बांधून देण्याची मोहीम पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाने शहरात निर्माण होणाºया घनकचºयाचे ओला व सुका असे विलगीकरण करण्यासाठी ‘कचरा लाख मोलाचा’ मोहीम सुरू केली होती. यासंदर्भात शासन स्तरावरून सातत्याने पाठपुरावा करूनही कचºयाच्या विलगीकरणासाठी महापालिकांच्या स्तरावर ठोस प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. यादरम्यान, १ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सव साजरा केला जाणार असून, यानिमित्ताने स्वच्छ, सुंदर व हरित महाराष्ट्राची संकल्पना साकारण्यासाठी १ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘हीरक महोत्सवी नागरी महाराष्ट्र स्वच्छता अभियान’राबविण्याचे शासनाने निर्देश जारी केले आहेत.

साठलेल्या कचºयावर बायोमायनिंग!
शहरांमधील डम्पिंग ग्राउंडवर प्रक्रिया न केलेल्या कचºयाचे भलेमोठे ढीग साचून आहेत. यामुळे परिसरातील जलस्रोत दूषित झाले असून, हवेचे प्रदूषण होत आहे. परिणामी नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे चित्र असल्यामुळे साठलेल्या कचºयावर ‘बायोमायनिंग’ प्रक्रियेद्वारे जागा मोकळी करण्याचे निर्देश आहेत.

 

Web Title: Diamond Festival Expedition in the State under 'Swachh Bharat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.