यूपीएससी उत्तीर्ण देवानंदची प्रकृती गंभीर, पुन्हा एक कोटीची हवी मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 09:01 PM2021-06-17T21:01:38+5:302021-06-17T21:03:10+5:30

Corona Virus : फुफ्फुस ट्रान्सप्लांट करण्यासाठी पुन्हा एक कोटी रूपयांच्या मदतीची गरज आहे.

Devanand, who has passed UPSC, is in critical condition and needs Rs 1 crore again! | यूपीएससी उत्तीर्ण देवानंदची प्रकृती गंभीर, पुन्हा एक कोटीची हवी मदत!

यूपीएससी उत्तीर्ण देवानंदची प्रकृती गंभीर, पुन्हा एक कोटीची हवी मदत!

Next

- प्रशांत विखे

तेल्हारा: यूपीएससीची परिक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या देवानंद तेलगोटे याच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू आहे. उपचारादरम्यान त्याचे फुफ्फुस निकामी झाले असून फुफ्फुस ट्रान्सप्लांट करण्यासाठी पुन्हा एक कोटी रूपयांच्या मदतीची गरज आहे. त्यासाठी सहृदयी व दानशूर समाजाने पुढाकार घेत, मदतीचा हात द्यावा. असे आवाहन मित्र व नातेवाईकांनी केले आहे.

देवानंद सुरेश तेलगोटे हा आयआयटी मुंबई येथून बीटेक झाला. केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा पास करून तो मुलाखतीस पात्र ठरला. एप्रिल महिन्यात दिल्ली येथे मुलाखतीसाठी गेला असता, त्याला तेथे कोरोनाची लागण झाली होती. मात्र कोरोनामुळे मुलाखत पुढे ढकलली. त्याच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात २८ एप्रिल ते १४ मेपर्यंत उपचार करण्यात आले. परंतु त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने त्याला अकोला येथून हैदराबाद येथील केआयएमएस हॉस्पिटल मध्ये एअर अँब्युलन्सने हलविण्यात आले होते. डॉक्टरांनी १५ मे ते १३ जून पर्यंत त्याच्या फुप्फुसामध्ये सुधारणा व्हावी. यासाठी इसीएमओ प्रक्रियेद्वारे उपचार केले. प्रकृती सुधारणा होत असताना, त्याला आयसीयुमधून बाहेर काढले होते. परंतु अचानक त्याचे हृदय बंद पडल्याने आणि फुफ्फुस निकाली झाल्यामुळे तो आता व्हेंटीलेटरवर आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी देवानंदच्या कुटुंबियांना फुप्फुस ट्रान्सप्लांट करावे लागेल आणि त्यासाठी १ कोटी रुपयांपर्यंत खर्च लागणार असल्याचे सांगितले. यापूर्वी त्याच्या मित्रांनी जमा केलेले एक कोटी रुपये निधी देवानंद यांच्या उपचारावर खर्च करण्यात आले. देवानंद याच्यावर उपचारावर प्रत्येक दिवशी २ लाखांपर्यंत खर्च येत आहे. त्यामुळे समाजातील दानशूर, सहृदयी नागरिकांनी आर्थिक मदतीसाठी पुढे यावे. असे आवाहन देवानंदच्या कुटुंबियांसह त्याच्या मित्र परिवाराने केले आहे.

 

सहृदयी समाजाने द्यावा मदतीचा हात...

देवानंद तेलगोटे याचे फुफ्फुस ट्रान्सप्लांट करण्यासाठी १ कोटी रूपयांचा खर्च आहे. त्यामुळे दानशूर समाजाने त्याला मदतीचा हात देऊन त्याचे प्राण वाचवावे. असे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी सुमित कोठे

फोन पे. गुगल पे. ८४४६७६९७०४, खाते क्रमांक ३३१३५५२४३९२ आयएफएससी कोड-एसबीआयएन ०००४८१८, सुरेश तेलगोटे (देवानंद चे वडील)

खाते क्रमांक ११५५५२२०५१४ आयएफएससी कोड- एसबीआयएन ०००४८१८ यावर आर्थिक मदत द्यावी.  

Web Title: Devanand, who has passed UPSC, is in critical condition and needs Rs 1 crore again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.