विद्युत तारेला स्पर्श झाल्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 10:34 AM2021-11-10T10:34:55+5:302021-11-10T10:35:36+5:30

Death of a youth due to touching an electric wire : अजय मोहन आटोटे (२६) राहणार समशेरपूर असे मृतक युवकाचे नाव आहे.

Death of a youth due to touching an electric wire | विद्युत तारेला स्पर्श झाल्याने युवकाचा मृत्यू

विद्युत तारेला स्पर्श झाल्याने युवकाचा मृत्यू

googlenewsNext

मूर्तिजापूर : घराच्या रंगरंगोटीचे काम चालू असताना पहाणी करण्यासाठी गेलेल्या युवकाचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता जांभा येथे घडली. अजय मोहन आटोटे (२६) राहणार समशेरपूर असे मृतक युवकाचे नाव आहे.
             ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम जांभा येथे रविंद्र इंगळे यांच्या घराचे रंगकाम सूरु होते, रंगकामाची ठेकेदारी करीत असलेला अजय आटोटे हा कामाची पहाणी करण्यासाठी घराच्या छतावर चढला असता वरुन गेलेल्या विद्युत तारेला त्याच्या डोक्याचा स्पर्श झाला व वीजेचा जोरदार धक्का बसल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या संदर्भात ग्रामीण पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Death of a youth due to touching an electric wire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.