वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेलेल्या मुलाच्या हाती सोपविला मृत्यूचा दाखला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 10:58 AM2020-08-11T10:58:46+5:302020-08-11T10:59:06+5:30

सकाळीच जेवणाचा डबा दिला, तेव्हा वडिलांची तब्बेत ठीक असल्याचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर रात्री हातात मृत्यूचा दाखला मिळाल्याने रुग्णाच्या मुलाला धक्काच बसला.

Death certificate handed over to the boy who brought the lunch box for the father! | वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेलेल्या मुलाच्या हाती सोपविला मृत्यूचा दाखला!

वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेलेल्या मुलाच्या हाती सोपविला मृत्यूचा दाखला!

googlenewsNext

- प्रवीण खेते 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कोरोनाचा उपचार सुरू असलेल्या वडिलांचा डबा घेऊन मुलगा रुग्णालयात जातो अन् त्या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी रुग्णाच्या मुलाच्या हाती चक्क मृत्यूचा दाखला देतो. हा धक्कादायक प्रकार अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात घडला आहे, सकाळीच जेवणाचा डबा दिला, तेव्हा वडिलांची तब्बेत ठीक असल्याचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर रात्री हातात मृत्यूचा दाखला मिळाल्याने रुग्णाच्या मुलाला धक्काच बसला.
बुलडाणा जिल्ह्यातील सातगाव म्हसला गावातील ७० वर्षीय विठ्ठलसिंह जाधव यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर बुलडाण्यातच उपचार सुरू करण्यात आले होते; परंतु डॉक्टरांनी एक्सरे काढल्यानंतर त्यांना न्यूमोनिया असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणाही झाली.
दरम्यान, वैद्यकीय चाचणी अहवालात ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने त्यांना कोविड वार्ड क्रमांक २९ मध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या सोबत मुलगा संदीप होता. संदीप जाधव हे वडिलांसाठी दररोज जेवणाचा डबाही घेऊन जात होते. नेहमीप्रमाणे त्यांनी शनिवारी सकाळी वडिलांसाठी जेवणाचा डबा नेला. यावेळी त्यांनी येथील कर्मचाºयाकडे वडिलांच्या तब्बेतीची चौकशी केली. वडिलांची तब्बेत ठीक असल्याचे कळल्यावर ते समाधानी झाले. त्याच दिवशी ते रात्रीचा डबा घेऊन गेले; मात्र त्यावेळी तुमचा रुग्ण येथे नाही, असे सांगत एका कर्मचाºयाने त्यांना डबा परत केला. वडिलांच्या उपस्थितीची चौकशी करताना एका वैद्यकीय कर्मचाºयानी त्यांच्या हाती थेट वडिलांच्या मृत्यूचा दाखलाच दिला. त्यामुळे संदीप जाधव यांना धक्काच बसला.


रुग्णाच्या नातेवाइकांसोबत संपर्क होत नाही, त्या रुग्णाचा मृतदेह शवगृहात सुरक्षित आहे. नियमानुसार, त्यांच्या नातेवाइकांच्या उपस्थितीतच अकोल्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केला जाईल. कोविड पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने जिल्हाबाहेर नेणे शक्य नाही. रुग्णांच्या नातेवाइकांनी योग्य संपर्क क्रमांक द्यावा म्हणजे असे प््नाकार टळतील.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला.


शनिवारी रात्री वडिलांसाठी डबा घेऊन गेल्यावर त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी थेट मृत्यूचा दाखला हातात दिल्याने धक्का बसला. मृतदेहाची मागणी केली; मात्र अद्याप मृतदेह मिळाला नाही.
- संदीप जाधव,
मृत रुग्णाचा मुलगा.

 

Web Title: Death certificate handed over to the boy who brought the lunch box for the father!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.