पिकांचे नुकसान: दुसऱ्या टप्प्यातील मदत मिळणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 01:43 PM2019-12-06T13:43:20+5:302019-12-06T13:43:39+5:30

दुसºया टप्प्यातील मदतनिधी शासनामार्फत अद्यापही जिल्हा स्तरावर प्राप्त झाला नाही.

Damage to crops: When will get the second stage help? | पिकांचे नुकसान: दुसऱ्या टप्प्यातील मदत मिळणार केव्हा?

पिकांचे नुकसान: दुसऱ्या टप्प्यातील मदत मिळणार केव्हा?

Next

- संतोष येलकर  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासनामार्फत वितरीत करण्यात आलेली २ हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपयांची मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना, दुसºया टप्प्यातील मदतनिधी शासनामार्फत अद्यापही जिल्हा स्तरावर प्राप्त झाला नाही. त्यामुळे दुसºया टप्प्यातील मदत केव्हा मिळणार, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
पावसाळा संपल्यानंतर अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामध्ये खरीप पिकांसह बागायती आणि फळपिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. हाता-तोंडाशी आलेली पिके अवकाळी पावसाने पळविल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे गत १८ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार शेतकºयांसाठी पीक नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात आली. राज्यातील ३४ जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात २ हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम शासनामार्फत वितरीत करण्यात आली. पहिल्या टप्प्यात जिल्हा स्तरावर उपलब्ध झालेला २५ टक्के मदतनिधी शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, दुसºया टप्प्यातील मदत निधी अद्याप शासनामार्फत जिल्हा स्तरावर प्राप्त झाला नाही, त्यामुळे दुसºया टप्प्यातील मदत निधी शासनाकडून केव्हा उपलब्ध होणार आणि मदतीची रक्कम बँक खात्यात केव्हा जमा होणार, यासंदर्भात शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

Web Title: Damage to crops: When will get the second stage help?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.