शेतात केली गांजाच्या झाडांची लागवड, ४९ झाडे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 10:31 AM2021-11-10T10:31:06+5:302021-11-10T10:31:13+5:30

Cultivation of cannabis plants in the field : गांजाची ४९ झाडे जप्त करुन आरोपी दिपक दयाराम गवई (५८) यास अटक केली. 

Cultivation of cannabis plants in the field, 49 trees confiscated | शेतात केली गांजाच्या झाडांची लागवड, ४९ झाडे जप्त

शेतात केली गांजाच्या झाडांची लागवड, ४९ झाडे जप्त

googlenewsNext

मूर्तिजापूर : तालुक्यात सहा महिन्यात गांजा जप्तीच्या अनेक कारवाया झाल्या असून यात गांजाचा मोठा साठाही पकडण्यात आला आहे. माना पोलीसांनी कवठा सोपीनाथ येथील एका शेतात ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १:३० वाजताच्या दरम्यान छापा घालून शेतात लावलेली गांजाची ४९ झाडे जप्त करुन आरोपी दिपक दयाराम गवई (५८) यास अटक केली. 

    तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम कवठा सोपीनाथ येथील दीपक दयाराम गवई वय ५८ वर्ष यांनी आपल्या शेतामध्ये अमली पदार्थ गांज्याच्या झाडाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांना मिळाली, मिळालेल्या माहितीची खात्री करुन सत्यता आढळून आल्याने ठाणेदार कैलास भगत यांनी नायब तहसिलदार बन्सोड यांना माहिती देऊन त्यांच्या समेवत दोन साक्षीदार व आपले सहकारी कर्मचारी नंदकिशोर षिकार, दिलीप नगोलकर, देवानंद दंदी, पंजाब इंगळे, बाळकृष्ण नलावडे, संदीप सरोदे, जय मंडावरे, उमेश हरमकर, पंकज वाघमारे , राजू डोंगरे, आकाश काळे यांच्या सह शेतात छापा घातला असता टाकून कारवाई दरम्यान आरोपीच्या अंगणात ४ व शेतातुन ४५ अंमली पदार्थ गांज्याची झाडे, वजन २ किलो ५४० ग्रॅम असा २५ हजार ४०० रुपयाचा माल जप्त केला. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Cultivation of cannabis plants in the field, 49 trees confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.