CoronaVirus : प्रतिकारक्षमता वाढविणाऱ्या संत्र्याची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 03:49 PM2020-03-20T15:49:18+5:302020-03-20T15:49:32+5:30

प्रतिकारक्षमता वाढविणे आणि जीवाणू, व्हायरस नष्ट करण्यासाठीचे औषधी गुणधर्म इतर फळांपेक्षा संत्रा फळात सर्वाधिक आहेत.

CoronaVirus: Increased demand for oranges that increase immunity | CoronaVirus : प्रतिकारक्षमता वाढविणाऱ्या संत्र्याची मागणी वाढली

CoronaVirus : प्रतिकारक्षमता वाढविणाऱ्या संत्र्याची मागणी वाढली

Next

- राजरत्न सिरसाट
अकोला: संत्रा फळात विषाणू नष्ट करण्यासह रोगप्रतिकारक्षमता वाढविणारे औषधी गुणधर्म असल्याने सद्यस्थितीत संत्रा फळाची मागणी वाढली असून,दरही वाढले आहेत. विदर्भाचा संत्र्यालाही चांगले दिवस आले आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणात शेजारच्या बांगलादेशात निर्यात झाली आहे.
‘कोराना’ विषाणूने सध्या जगाला वेठीस धरले असून, भारतातही या विषाणूचा काही प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे नागरिक स्वत:ची रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यावर भर देत आहेत. संत्रा रस, फळे ही कोरोनावर उपाय नाही; पण प्रतिकारक्षमता वाढविणे आणि जीवाणू, व्हायरस नष्ट करण्यासाठीचे औषधी गुणधर्म इतर फळांपेक्षा संत्रा फळात सर्वाधिक आहेत.
राज्यातील १ लाख ४८ हजार ५१० हेक्टरपैकी सर्वाधिक १ लाख ३५ हजार हेक्टर संत्रा क्षेत्र विदर्भात आहे. यावर्षी पावसाचा काहीसा फटका बसला तरी बऱ्याव्पैकी उत्पादन झाले असून, सद्यस्थितीत संत्रा विक्री सुरू आहे.आजमितीस देशासह परदेशातही संत्र्याची मागणी वाढली आहे. पंरतु कोरोना यावर्षी आडवा येत आहे. दरम्यान, गतवर्षी देशातून सर्वाधिक संत्र्याची निर्यात ही २९,१२५.५४ हजार मेट्रिक टन बांगलादेशात करण्यात आली होती. त्याखालोखाल नेपाळ, आखाती देश, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, भूतान आणि इतर देश मिळून ४३,०९८.३१ मेट्रिक टन संत्री निर्यात करण्यात आला होती. यापोटी भारताला २४७ कोटी रुपये परकीय चलन मिळाले. यात विदर्भाचा वाटा सर्वात जास्त होता.

संत्रा फळातील गुणधर्म!
संत्र्यामध्ये व्हिटॅमिनची मात्रा ४४ ते ५४ मिली आहे. १०० मिली रसामध्ये एवढी मात्रा प्राप्त होते. याव्यतिरिक्त यात व्हिटॅमिन ‘सी’ भरपूर आहे. हा गुणधर्म व्हिटॅमिन ई निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. विशेष म्हणजे, संत्र्यात फायटो केमिकल्सचे प्रमाण भरपूर असून, फायटो केमिकल्सचे फ्लेओनॉइड्स, टर्पेनॉइड्स, अल्कोलॉइड्स, फेनॉलिक, सायनोरजेनिक कंपाउडस,ग्लायकोसाइड्स हे घटक आहेत. या घटकात बुरशी, बॅक्टेरिया, व्हायरस नष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे. लिमोनीन नावाचा घटक हा अ‍ॅन्टी आॅक्सिडंट्स म्हणून शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्याचे काम करतो. लिमोनीन हा घटक कर्करोगावर उपयुक्त आहे. संत्रा रसात तर हा घटक आहेच, याव्यतिरिक्त संत्रा सालीमध्ये सर्वाधिक गुणधर्म आहेत.

फॉलिक अ‍ॅसिड
यात व्हिटॅमिन (फॉलिक अ‍ॅसिड) ‘ए’ आणि ‘बी-६’ असून, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्परस, सेलेनियम, मॅग्नेशियम, रायबोफ्लोविंग, सॅन्थोटेनिक अ‍ॅसिड आहे. यात कॅलरीस कमी असल्याने डायबेटीसच्या रुग्णासदेखील शिफारस करण्यात आली आहे.

संत्रामध्ये शरीरातील जीवाणू, व्हायरस, बुरशी नष्ट करण्यासह प्रतिकारक्षमता वाढविणारे भरपूर गुणधर्म आहेत. कर्करोगावरही गुणकारी आहे. म्हणूनच परदेशात मागणी वाढली असून, सध्या बांगलादेशात निर्यात होत आहे.
- डॉ. दिनेश पैठणकर,
शास्त्रज्ञ,
अ.भा. समन्वयित फळ संशोधन केंद्र,
डॉ. पंदेकृवि., अकोला.

 

 

 

Web Title: CoronaVirus: Increased demand for oranges that increase immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.