CoronaVirus : मंगळवार, बुधवार अकोला जिल्ह्यात संपूर्ण ‘लॉकडाउन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 10:13 AM2020-05-18T10:13:21+5:302020-05-18T10:14:52+5:30

दोन दिवस जिल्ह्यात संपूर्ण ‘लॉकडाउन’चा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी दिला.

CoronaVirus: A complete 'lockdown' in Akola district on Tuesday and Wednesday! | CoronaVirus : मंगळवार, बुधवार अकोला जिल्ह्यात संपूर्ण ‘लॉकडाउन’!

CoronaVirus : मंगळवार, बुधवार अकोला जिल्ह्यात संपूर्ण ‘लॉकडाउन’!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात ३१ मेपर्यंत ‘लॉकडाउन’ला मुदतवाढ देत, कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांची वाढती संख्या बघता, अकोट उपविभाग वगळता मंगळवार व बुधवार असे दोन दिवस जिल्ह्यात संपूर्ण ‘लॉकडाउन’चा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी दिला.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी या संपूर्ण संचारबंदीतून रुग्णालय, रुग्णवाहिका व औषधांची दुकाने वगळण्यात आली असून, दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी सकाळी ६ ते दुपारी १ व दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत मुभा देण्यात आली आहे. तसेच २१ ते ३१ पर्यंत लॉकडाउनच्या कालावधीने सकाळी ६ ते दुपारी १ वाजतापर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.


बाळापूर-पातूरमधील प्रतिबंधित क्षेत्र मोकळे!
गत २८ दिवसांच्या कालावधीत या दोन्ही प्रतिबंधित क्षेत्रात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याने पातूर व बाळापूर येथील प्रतिबंधित क्षेत्र वगळण्यात आले.


कृषी केंद्र ४ वाजतापर्यंत सुरू!
‘लॉकडाउन’ या कालावधीत जिल्ह्यातील कृषी संबंधित कृषी सेवा केंद्र, बियाणे-खते व कृषी संबंधित इतर दुकाने सकाळी ६ ते दुपारी ४ वाजतापर्यंत सुरू राहणार.

Web Title: CoronaVirus: A complete 'lockdown' in Akola district on Tuesday and Wednesday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.