CoronaVirus in Akola : मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 10:49 AM2020-05-27T10:49:35+5:302020-05-27T10:49:42+5:30

महापालिकेच्या एका वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

CoronaVirus in Akola: Corporation's health officer infected with corona | CoronaVirus in Akola : मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

CoronaVirus in Akola : मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

Next

अकोला: शहरात कोरोना विषाणूचे उगमस्थान ठरलेल्या प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा परिसरात रुग्णसेवा बजावणाºया महापालिकेच्या एका वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या प्रकाराची दखल घेत आयुक्त संजय कापडणीस यांच्या निर्देशानुसार मनपाचे सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी व एकमेकांच्या संपर्कातील सर्व कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत. मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या स्तरावर १६ मार्चपासून शहरात दाखल होणाºया बाहेर गावातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला होता. तेव्हापासून महापालिकेची वैद्यकीय आरोग्य यंत्रणा तसेच शिक्षक,आशा वर्कर, मालमत्ता करवसुली विभागातील वसुली लिपिक तसेच सर्व अधिकारी कामाला लागल्याचे चित्र आहे. शहरात प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा, ताजनापेठ, मोहम्मद अली रोड, फतेह अली चौक, सराफा बाजार, गवळीपुरा, माळीपुरा, प्रभाग क्रमांक २ अंतर्गत येणारा अकोट फाइल परिसर तसेच जुने शहरातील प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाºया खैर मोहम्मद प्लॉटमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याचे चित्र आहे. बैदपुरा भागात मागील अनेक दिवसांपासून रुग्णाची सेवा बजावणाºया मनपाच्या एका वैद्यकीय आरोग्य अधिकाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे २५ मे रोजी समोर आले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या निर्देशानुसार वैद्यकीय आरोग्य यंत्रणेतील सर्व डॉक्टर, परिचारिका तसेच अधिनस्त सर्व कर्मचाºयांनी घशातील स्त्रावाचे नमुने दिले आहेत.


अधिकाºयांच्या मुक्कामाची व्यवस्था करणार!
महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला असून मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेलासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व बाबींची दखल घेत कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन कोरोनाचा प्रत्यक्षात मुकाबला करणाºया मनपाचे सर्व अधिकारी, क्षेत्रीय अधिकाºयांना आता घरी न पाठवता शहरातील हॉटेल किंवा सुसज्ज मंगल कार्यालयात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाकडून चाचपणी सुरू झाली आहे. क्षेत्रिय अधिकाºयांनी सुद्धा घरी न जाता बाहेरच मुक्काम करण्याची तयारी दर्शवली आहे.


शहरात समूह संसर्गाचा धोका वाढला असून, कंटेनमेन्ट झोनमध्ये जाणाºया मनपा अधिकारी, कर्मचाºयांच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी शहरातील हॉटेल किंवा सुसज्ज मंगल कार्यालयाची माहिती घेतली जात आहे.
- संजय कापडणीस,
आयुक्त मनपा.

 

 

 

Web Title: CoronaVirus in Akola: Corporation's health officer infected with corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.