CoronaVirus in Akola : ग्रामीण भागात ९५९२ प्रवासी १७ एप्रिलपर्यंत ‘क्वारंटीन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 06:05 PM2020-04-05T18:05:36+5:302020-04-05T18:05:45+5:30

अकोला जिल्ह्यात पोहोचण्याच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या ‘क्वारंटीन’ कालावधीत त्यांना ठेवण्यात आले.

CoronaVirus in Akola: 9592 migrants to rural areas 'Quarantine' till April 7 | CoronaVirus in Akola : ग्रामीण भागात ९५९२ प्रवासी १७ एप्रिलपर्यंत ‘क्वारंटीन’

CoronaVirus in Akola : ग्रामीण भागात ९५९२ प्रवासी १७ एप्रिलपर्यंत ‘क्वारंटीन’

Next

अकोला: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात‘ लॉकडाऊन’ तर राज्यात संचारबंदी लागू झाली. या काळात म्हणजेच १० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत देशभरातून अकोला जिल्ह्यात १९०८१ प्रवासी दाखल झाले. त्या प्रवाशांची आरोग्य तपासणी ग्रामीण भागातील केंद्रांमध्ये करण्यात आली. अकोला जिल्ह्यात पोहोचण्याच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या ‘क्वारंटीन’ कालावधीत त्यांना ठेवण्यात आले. त्यापैकी ९४८९ प्रवाशांचा ‘क्वारंटीन’ कालावधी उद्या सोमवारी पूर्ण होत आहे. उर्वरित ९५९२ प्रवाशांना १७ एप्रिलपर्यंत ‘क्वारंटीन’ ठेवण्यात आले. त्यांनी खबरदारी म्हणून या काळात घरातच राहावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी केले.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो लोक कामानिमित्त देश, राज्यातील विविध शहरांमध्ये होती. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ झाले. राज्यात संचारबंदीही लागू झाली. या परिस्थितीत आहे त्या ठिकाणी न राहता हजारो लोकांनी जिल्ह्यातील मूळ गावाकडे धाव घेतली. त्यातून कोरोना प्रसाराचा धोका आणखीच वाढत गेला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी ठेवत त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये २२ मार्चपासून दैनंदिन येणाºया प्रवाशांचीही तपासणी करण्यात आली. ३ एप्रिलपर्यंत दाखल झालेल्यांपैकी सर्वांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पुढील उपचाराची गरज असलेल्या तसेच संदिग्ध म्हणून २०६ व्यक्तींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. त्यापैकी ३४ जणांना ‘आयसोलेशन’मध्ये ठेवण्यात आले. तसेच १४ दिवसांपर्यंत ‘क्वारंटीन’ केलेल्यांची संख्या ६०३ एवढी आहे. त्याशिवाय, बाहेर जिल्ह्यातून दाखल झाल्याने घरातच ‘क्वारंटीन’ केलेल्या सर्व प्रवाशांची संख्या ४ एप्रिलपर्यंत १९२९६ एवढी झाली आहे. त्यानुसार शनिवारपर्यंत पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संदर्भित केलेल्या प्रवाशांची संख्या २२० वर पोहोचली आहे. दर दिवशी आलेल्यांचाही ‘क्वारंटीन’ कालावधी निश्चित केला जात आहे.


- ‘क्वारंटीन’मध्ये असलेले प्रवासी
२२ मार्च रोजी तपासणी झालेल्या तसेच ‘क्वारंटीन’मध्ये असलेल्या १०८० प्रवाशांचा कालावधी ५ एप्रिल रोजी पूर्ण झाला. २३ मार्च रोजी
आलेल्या ३१८६ प्रवाशांचा उद्या ६ एप्रिल रोजी कालावधी संपुष्टात येत आहे. ३ एप्रिलपर्यंत दाखल झालेल्या एकूण प्रवाशांचा ‘क्वारंटीन’ कालावधी १७ एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. तोपर्यंत ग्रामीण भागातील संबंधित प्रवासी व त्यांच्या कुटुंबीयांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले यांनी केले आहे.

 

Web Title: CoronaVirus in Akola: 9592 migrants to rural areas 'Quarantine' till April 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.