Corona Vaccination : दाेन मिनिटांमध्येच दाेनशेच्यावर लस बुकिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 11:37 AM2021-05-12T11:37:13+5:302021-05-12T11:38:43+5:30

Corona Vaccination : दाेन मिनिटांमध्येच दाेनशेच्या वर लस बुकिंग हाेत असल्याने अनेकांना निराशेला सामाेरे जावे लागत आहे.

Corona Vaccination: Vaccine booking on Danshe within minutes! | Corona Vaccination : दाेन मिनिटांमध्येच दाेनशेच्यावर लस बुकिंग!

Corona Vaccination : दाेन मिनिटांमध्येच दाेनशेच्यावर लस बुकिंग!

Next
ठळक मुद्देनेटवर्कमुळेही अनेकांना प्रतीक्षाकाेव्हॅक्सिनची उपलब्धताच नाही

अकाेला : काेविड लसीकरणासाठी ऑनलाइन बुकिंग अनिवार्य केली असल्याने संध्याकाळी पाच वाजेपासून नागरिक काॅम्प्युटर व माेबाइलच्या माध्यमातून काेविन लिंक ओपन करून बसतात मात्र, अवघ्या दाेन मिनिटांमध्येच दाेनशेच्या वर लस बुकिंग हाेत असल्याने अनेकांना निराशेला सामाेरे जावे लागत आहे.

कोविडच्या गंभीर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यापासून संरक्षणाचे प्रभावी माध्यम म्हणून लोक कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवातीपासूनच लाभार्थींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ४५ वर्षांवरील लाभार्थींना लसीकरण केंद्रावरच नोंदणीचा पर्याय उपलब्ध होता. दरम्यान, १ मेपासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लाभार्थींच्या लसीकरणाला सुरुवात झाली. या वयोगटातील लाभार्थींची संख्या जास्त असल्याने आता केवळ ऑनलाइन नोंदणी करूनच लस बुक करणे अनिवार्य केले आहे. मात्र, लसीचे बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांमध्ये बुकिंग सेवा बंद होत आहे. जिल्ह्यात १ मेपासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लाभार्थींसाठी कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्याच आठवड्यात लसीसाठी तरुणाईची घोडदौड सुरू झाली. मात्र, ऑनलाइन लस बुकिंग अवघ्या काही मिनिटांमध्ये बंद होत आहे. त्यामुळे अनेकांच्या हाती निराशा लागत आहे, तर ग्रामीण भागात अनेकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे.

 

लस बुकिंगसाठी पाच वाजेचा मुहूर्त

कोविड लसीकरणासाठी ऑनलाइन लस बुकिंगची सायंकाळी ५ वाजता सुरू होते. मात्र, काही मिनिटांमध्येच ती बंद होते. अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या असल्याने बुकिंग हाेण्यात अडचणी निर्माण हाेत आहेत. सध्या राज्यात कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस देय असलेल्या ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांची संख्या पाच लाखांपेक्षा अधिक आहे. या वयोगटातील नागरिकांना लसीचा पुरवठा हा केंद्र सरकारकडून केला जातो. दुसरा डोस देय असलेल्यांची संख्या वाढत आहे.

 

गेल्या चार दिवसांपासून बुकिंगचे प्रयत्न करीत आहे. मात्र, अवघ्या काही मिनिटांमध्ये स्लाॅट बुक हाेत असल्याने बुकिंग मिळत नाही.

- प्रगती शर्मा

 

काेविनची लिंक ओपन झाल्यानंतर लसीकरणाचे केंद्र निवडेपर्यंत त्या केंद्रावरील लस बुकिंग पूर्ण हाेत आहे. शासनाने लसींचा साठा वाढवावा.

- विजया पांडे

 

लसीकरणासाठी ऑनलाइन बुकिंग ही चांगली व्यवस्था असली तरी अपुरे केंद्र व कमी साठ्यामुळे सर्वांनाच बुकिंग मिळत नाही

- गजानन घाटाेळ

 

काेव्हॅक्सिनचा पहिला डाेस घेतला आहे, दुसऱ्या डाेससाठीची मुदत संपत आली आहे. मात्र, बुकिंग मिळत नसल्याने त्रस्त झालाे आहे.

- प्रकाश देशमुख

 

Web Title: Corona Vaccination: Vaccine booking on Danshe within minutes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.