Corona Efect : व्हाटसअ‍ॅपवर दर्जेदार कादंबरीचा पुर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 06:31 PM2020-03-21T18:31:49+5:302020-03-21T18:32:10+5:30

बुध्दिजीवी नागरिक व्हाटस्अ‍ॅपवर दर्जेदार मराठी , हिंदी कादंबरी वाचत आहेत.

Corona Efect: A flood of quality novels on WhatsApp! | Corona Efect : व्हाटसअ‍ॅपवर दर्जेदार कादंबरीचा पुर!

Corona Efect : व्हाटसअ‍ॅपवर दर्जेदार कादंबरीचा पुर!

Next

- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी शासन शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. कामात व्यस्त राहणाऱ्या नागरिकांना घरी बसून कारायचे तरी काय, असा प्रश्न पडला. मात्र, स्वयं विलगीकरण करणाºया नागरिकांनी तर आपला छंद जोपासण्यासाठी ही उत्तम संधीच मिळाली आहे. कामाच्या व्यापात आपला छंद जोपासता येत नाही. त्यामुळे अशा कलाप्रेमी नागरिक वेळेचा सदुपयोग करीत आहेत. कोरोना संदर्भात अनेक फालतू विनोद, अफवा पसरविण्यात येत आहेत. परंतू बुध्दिजीवी नागरिक व्हाटस्अ‍ॅपवर दर्जेदार मराठी , हिंदी कादंबरी वाचत आहेत.
रविवारी जनता संचारबंदी भारत सरकारने देशभरात लागू केली आहे. अशावेळी दिवसभर घरात बसून कादंबरी वाचन केल्यास काय हरकत आहे, असा विचार करू न व्हॉटसअ‍ॅपवर शनिवारी आलेल्या भरपुर अशा कादंबरी मराठी वाचक डाउनलोड करू न घेत आहेत. यामध्ये द.मा.मिरासदार, रत्नाकर मतकरी, वि.स.खांडेकर, सुधा मुर्ती, रणजित देसाई, शिवाजी सामंत, गुलजार आदी दिग्गज लेखकांच्या कादंबरी वाचायला मिळत आहेत. यामध्ये प्रामुख्याने चकाट्या, झोपाळा, घर हरविलेली माणसं, दोस्त, पाणपोई, मोसाद, तनमन, मध्यरात्र, धागे, स्वप्नातील चांदण, परीघ, पावनखिंड, बाई बायको कॅलेण्डर, स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी, अ‍ॅडम, फुकट, ययाति, मृत्युंजय या दर्जेदार कादंबरींचा समावेश आहे. कोरोना विषाणूला घाबरू न जावू नका, मात्र, काळजी घेतली तर निश्चितच या विषाणूचा नायनाट करणे सहज शक्य होणार आहे. यासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडण्याचे टाळले पाहिजे. वाचनामुळे मेंदुला चालना मिळते. नवनवीन शब्दांमुळे बौध्दिक क्षमता वाढण्यासही मदत होते. नवनवीन माहिती तर मिळतेच शिवाय ज्ञानात भर पडते. आपल्या आवडीच्या विषयांची पुस्तके वाचून निश्चितच कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यापासून आपण वाचू शकतो, ऐवढे मात्र निश्चित.

 

Web Title: Corona Efect: A flood of quality novels on WhatsApp!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.