‘कोरोना’च्या संकटात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार निम्म्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 10:17 AM2020-05-31T10:17:05+5:302020-05-31T10:17:38+5:30

दर दिवसाला केवळ ७० ते १०० मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत.

 Corona crisis : property sales slodown in Akola | ‘कोरोना’च्या संकटात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार निम्म्यावर!

‘कोरोना’च्या संकटात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार निम्म्यावर!

Next

- संतोष येलकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘कोरोना’चे संकट आणि लागू असलेल्या ‘लॉकडाउन’च्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार निम्म्यावर आले आहेत. जिल्ह्यात दररोज सरासरी १५० ते २०० होणारे खरेदी-विक्रीचे व्यवहार ‘कोरोना’ संकटाच्या परिस्थितीत दर दिवसाला केवळ ७० ते १०० मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी आणि ‘लॉकडाउन’च्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ३० मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार १४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये व या कार्यालयामार्फत होणारे स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २० एप्रिलपासून जिल्ह्यात दुय्यम निबंधक कार्यालयांतर्गत होणारे मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि मुद्रांक शुल्कविषयक दस्त नोंदणी आॅनलाइन प्रणालीद्वारे पूर्ववत सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील १३ दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दररोज सरासरी १५० ते २०० मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार होत होते; मात्र कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि लॉकडाउनच्या परिस्थितीत सध्या जिल्ह्यात दर दिवसाला सरासरी केवळ ७० ते १०० मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. त्यामुळे ‘कोरोना’च्या संकटात जिल्ह्यातील स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार निम्म्यावर आल्याचे वास्तव आहे.


नवीन व्यवहार कमी;गहाण, इसारखताचे व्यवहार जास्त!
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. त्यामध्ये नवीन व्यवहाराचे प्रमाण कमी असून, गहाणखत, इसारखत व बक्षीसपत्राच्या व्यवहाराचे प्रमाण जास्त असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

Web Title:  Corona crisis : property sales slodown in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.