‘कोरोना’मुळे रंग काळवंडले; पेंटर झाले ‘बेरंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 02:52 PM2020-04-25T14:52:32+5:302020-04-25T14:52:40+5:30

घर रंगविणाºयांना किमान वर्षभर तरी ते बेरंग राहण्याची भीती निर्माण झाली आहे. 

‘Corona’ causes the color to turn black; Painter 'colorless' | ‘कोरोना’मुळे रंग काळवंडले; पेंटर झाले ‘बेरंग’

‘कोरोना’मुळे रंग काळवंडले; पेंटर झाले ‘बेरंग’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : साधारणत: जानेवारी ते जून हा काळ पेंटरसाठी अतिशय अनुकूल असतो. या काळात नवीन बांधकामे झालेली असतात तर जुन्या घरांवर नवीन रंगरंगोटी करण्यासाठी नागरिक उत्सुक असतात; मात्र चीनपासून सुरू झालेला कोरोना महामारीचा प्रसार भारतातही झाला आणि मार्चपासून संपूर्ण भारत लॉकडाउनमध्ये गेला. इतर रोजगारांप्रमाणे पेंटरही घरीच बसून राहिले. कोरोनाच्या भीतीचा रंग हा दिवसेंदिवस अधिक गडद होत असल्याने घर रंगविणाºयांना किमान वर्षभर तरी ते बेरंग राहण्याची भीती निर्माण झाली आहे. 
कोरोनाच्या संसर्गापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा परिणाम अनेकांच्या कामांवर झाला असून, रोज कमावतील तर रोज खातील, अशी अवस्था असणाºयांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. विशेष म्हणजे, मध्यम वर्गावर हा मार जास्त पडत असल्याचे दिसून येते. हा वर्ग अतिशय स्वाभिमानी असल्याने स्थिती दयनीय आहे. घरादारांना रंगसाज चढवून चकचकीत करणारे पेंटर मध्यम वर्गातच मोडतात. लॉकडाउनमुळे किमान वर्षभर तरी ते बेरंग राहण्याची भीती निर्माण झाली आहे. 
जानेवारी ते जून या काळात पेंटरला काम भरपूर असते. आॅर्डरप्रमाणे काम करावे आणि आपला पैसा घरी न्यावा, अशी दैनंदिनी असलेल्या या वर्गावर आता उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. महिनाभरापासून हाताला काम नाही म्हणून पैसाही नाही. असे जवळपास दोन हजार हजार पेंटर्स सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या संकटाशी झुंज देत आहेत. सध्या लॉकडाउन सुरू आहे आणि कधी उठेल, याचा नेम नाही. लॉकडाउन उठल्यावरही जीवनमान सुरळीत होण्यास बराच वेळ जाणार आहे. त्यातच पावसाळ्यात पेंटिंगची कामे नसतात. दिवाळीत कामे निघत असली तरी यंदा उन्हाळ्याची तूट भरून काढण्याकडेच नागरिकांचा प्रथम कल असेल. अशा स्थितीत पेंटर वर्ग दयनीय अवस्थेत जाण्याची शक्यता आहे. वर्षभर तरी पेंटर्स वर्ग विनारोजगार राहण्याची भीती निर्माण झाली आहे.


बांधकाम मजूर अंतर्गत अनेक पेंटरची नोंद आहे; मात्र त्यामध्ये सर्वच पेंटरचा समावेश नाही. हे कामगार परिश्रमी आहोत आणि कुणापुढे कधी हात पसरवत नाहीत. त्यांना शासनाने साथ दिली नाही तर या पेंटरचे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. त्यामुळे शासनाने विशेष योजना आखून मदत देण्याची गरज आहे. 
- कॉ. नयन गायकवाड, 
आयटक राज्य कौन्सिल सदस्य


सर्वच पेंटरच्या हातांना काम नाही, मी अकोट फैलमध्ये राहतो. या परिसरात माझ्यासारखे हातावर पोट असणारे अनेक कामगार आहेत. आमच्यापर्यंत कोणतीच मदत पोहोचली नाही. अनेकांच्या बांधकाम मजूर म्हणून नोंदी नसल्याने त्यांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे पालकमंत्री व शासनाने लक्ष घालून शासकीय योजनेतून प्रत्येक पेंटरला या काळात मदतीचा हात देण्याची गरज आहे.
- राजानंद डोईफोडे, 
पेंटर अकोट फैल.

Web Title: ‘Corona’ causes the color to turn black; Painter 'colorless'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.