सततच्या पावसामुळे कपाशी पडली पिवळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:52 PM2019-10-06T12:52:57+5:302019-10-06T12:53:03+5:30

आणखी पाऊस आल्यास हे पीक हातचे जाण्यासह उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Continuous rains cause crop yellow | सततच्या पावसामुळे कपाशी पडली पिवळी!

सततच्या पावसामुळे कपाशी पडली पिवळी!

googlenewsNext

अकोला: सततच्या पावसामुळे विदर्भातील कपाशी पीक पिवळे पडले असून, आणखी पाऊस आल्यास हे पीक हातचे जाण्यासह उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विदर्भात ५० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली आहे. पावसाळ््याच्या सुरुवातीला पाऊस पडला नसल्याने पेरण्यांना विलंब झाला. पेरणीनंतर पुन्हा चार आठवडे पावसाचा खंड पडल्याने हजारो हेक्टरवरील पिके हातची गेली. शेतकऱ्यांना त्यावर नांगर फिरवावा लागला. २६ जुलैपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. तथापि, हा पाऊस दमदार नसला तरी सतत तुरळक स्वरू पाचा पडत असून, कायम ढगाळ वातावरण असल्याने शेतात शेवाळ निर्माण झाले. परिणामी कपाशीचे पीक पिवळे पडले आहे. हे वातावरण कीड, रोगांना पोषक ठरत असून, रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशीवर बोंडअळी तर आलीच रसोशोषण करणाºया किडींचा प्रादुर्भावही वाढला आहे; तणनाशके निष्प्रभावी ठरत असल्याने पिकांमध्ये तण प्रचंड वाढले आहे. कीड, रोग, शेतातील तणांचे व्यवस्थापन, नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी जहाल, आत्यांतिक विषारी कीटकनाशके फवारणी करीत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे.

 

Web Title: Continuous rains cause crop yellow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.