जिल्ह्यात सहा ऑक्सिजन प्लांटची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:17 AM2021-05-15T04:17:53+5:302021-05-15T04:17:53+5:30

ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावे- पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन अकोला - कोरोना विषाणूचा दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ...

Construction of six oxygen plants in the district | जिल्ह्यात सहा ऑक्सिजन प्लांटची निर्मिती

जिल्ह्यात सहा ऑक्सिजन प्लांटची निर्मिती

Next

ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावे-

पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन

अकोला - कोरोना विषाणूचा दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे,त्यामुळे शासकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील कोविड उपचार सुविधांवर अतिरिक्त भार पडतो आहे. तथापि,जिल्हा प्रशासनाने पालकमंत्री ना.बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून कोविड उपचारांसाठी ग्रामीण भागात ३१३ ऑक्सिजन बेड व सहा ऑक्सिजन प्लांट निर्मितीसह अन्य उपचार सुविधा निर्माण केल्या आहेत. तरी ग्रामीण भागातील कोविड रुग्णांनी स्थानिक रुग्णालयात उपचार घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.

कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना आढावा बैठकीत ग्रामीण रुग्णालयात आवश्यक सोईसुविधा, वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग स्टाफ उपलब्ध करून त्या त्या भागातील रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात उपचार सुविधा निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी, बाळापूर, अकोट व तेल्हारा येथे प्रत्येकी एक तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे दोन असे सहा ऑक्सिजन प्लांट निर्मिती होणार आहे. तसेच नॉन ऑक्सिजन बेड तयार करण्याचे कार्यादेश दिले असून या सुविधाही येत्या १५ दिवसात कोरोना रुग्णांच्या उपचाराकरीता उपलब्ध होतील. त्यामध्ये अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी व बाळापूर येथे प्रत्येकी १०, तर मूर्तिजापूर येथे ५०, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे १५ असे एकूण १०५ नॉन ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे ५० व खेडकर महिला वसतिगृह तेल्हारा येथे ५० बेडची व्यवस्था प्रस्तावित असून ती ही व्यवस्था येत्या १५ दिवसात पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली आहे.

बाॅक्स....

अकोट येथे २० ऑक्सिजन बेड, तेल्हारा येथे २०, बार्शीटाकळी येथे २०, बाळापूर येथे २०, मूर्तिजापूर येथे ४८, जिल्हा स्त्री रुग्णालय येथे ५०, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे ३५, तर पंजाबराव देशमुख विद्यापीठ येथील जॅम्बो हॉस्पिटल येथे १०० असे एकूण ३१३ ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.

Web Title: Construction of six oxygen plants in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.