भारतातील पहिल्या ऑनलाइन राष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषदेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:18 PM2020-10-17T12:18:19+5:302020-10-17T12:19:31+5:30

National Veterinary Council Akola देशभरातून एकूण १९४ नोदणीकृत विद्यार्थी, प्राध्यापक, पशुवैद्यकीय २८ निमंत्रित पाहुणे, परीक्षक व व्याख्याते यानी सहभाग घेतला होता.

Conclusion of India's First Online National Veterinary Council | भारतातील पहिल्या ऑनलाइन राष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषदेचा समारोप

भारतातील पहिल्या ऑनलाइन राष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषदेचा समारोप

googlenewsNext

अकोला : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था यांच्या वतीने २ ते १४ आॅक्टोबर २०२० दरम्यान आयोजित भारतातील पहिल्या तीन दिवसीय ऑनलाइन राष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘पशुवैद्यक क्षेत्रातील रोगनिदान आणि औषधोपचारमधील नवनवीन क्षितिजे’ या विषयावरील परिषदेच्या समारोप प्रा. डॉ. एन.व्ही. कुरकुरे, संचालक संशोधन व प्रा. डॉ. व्ही.डी. आहेर, संचालक विस्तार शिक्षण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अनिल भिकाने, सहयोगी अधिष्ठाता, स्ना.प.प. संस्था अकोला हे होते. समारोपप्रसंगी आयोजक सहसचिव डॉ. रत्नाकर राऊळकर यांनी अहवाल वाचन करून परिषदेचा इतिवृत्तांत सादर केला. सदर परिषदेत देशभरातून एकूण १९४ नोदणीकृत विद्यार्थी, प्राध्यापक, पशुवैद्यकीय २८ निमंत्रित पाहुणे, परीक्षक व व्याख्याते यानी सहभाग घेतला होता. एकूण २७ स्नातकपूर्व पदवी विद्यार्थी आणि ७१ स्नातकोत्तर पदवी विद्यार्थी यांनी आपले पशुचिकित्सालयीन संशोधन सादर केले. संचालन डॉ. महेश इंगवले, आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुनील वाघमारे यांनी केले. परिषदेच्या आयोजनासाठी प्रा. डॉ. चैतन्य पावशे, प्रा डॉ. मिलिंद थोरात, प्रा डॉ. शैलेंद्र कुरळकर, डॉ. श्याम देशमुख, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. किशोर पजई, डॉ. सुनील हजारे, डॉ, दिलीप बदूकले, डॉ. गिरीश पंचभाई आदींनी परिश्रम घेतले. आयोजक सचिव डॉ रणजीत इंगोले व  सह सचिव डॉ. प्रवीण बनकर यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर करत गुणवंत विद्यार्थ्यांचे आयोजन समितीच्या वतीने अभिनंदन केले. 

स्पर्धेचा निकाल
पशुऔषधोचारशास्त्र विषयात स्नातकपूर्व प्रवर्गात प्रथम क्र- ए.आय.सय्यद, मुंबई; व्दितीय क्र.चंदा नबारका, उदगीर; तृतीय क्र.कु. मोहिनी शिरसाट, उदगीर तसेच स्नातकोत्तर प्रवर्गात  प्रथम क्र- कु. रुपाली घाग, केरळ; व्दितीय क्र.कु. कल्याणी ठाकूर, नागपूर व सुश्मिता चौधरी, बिकानेर; तृतीय क्र.प्रगती सालूटगी, मुंबई 


पशु शल्यचिकित्सा व क्ष किरण शास्त्र: स्नातकपूर्व प्रवर्गात  प्रथम क्र- ईश्वरी बडगुजर, राजस्थान; व्दितीय क्र.दीक्षा, हिस्सार ; तृतीय क्र.दीपिका अहलावात, हरियाणा आणि स्नातकोत्तर प्रवर्गात  प्रथम क्र- दिशांत सैनी, हिस्सार; व्दितीय क्र. कु. गौरी उभारे, शिरवळ; तृतीय क्र.कु. तिष्ठा जोसेफ, नागपूर 


पशुप्रजनन व प्रसूती शास्त्र: स्नातकपूर्व प्रवर्गात  प्रथम क्र- वरुण नाईक, कर्नाटक; व्दितीय क्र.नवनीत कृष्णन, तंजावर; तृतीय क्र.कोनेती प्रिया, उदगीर आणि स्नातकोत्तर प्रवर्गात  प्रथम क्र- प्रवीण शिंदे, अकोला ; व्दितीय क्र.कु. रुचिका सांगळे, अकोला; तृतीय क्र.एस.एस. गौरव, केरळ 


पशुरोगनिदान शास्त्र :स्नातकपूर्व  प्रवर्गात  प्रथम क्र- कु. रिचा चिंचकर, मुंबई आणि स्नातकोत्तर प्रवर्गात  प्रथम क्र-के. कृतिगा, केरळ; व्दितीय क्र. कु. श्रुती भोसले, शिरवळ; तृतीय क्र. अतुल उरकुडे, नवसारी 

Web Title: Conclusion of India's First Online National Veterinary Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.