कालबद्ध पदोन्नतीचा दावा फेटाळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 02:34 PM2020-01-27T14:34:20+5:302020-01-27T14:34:57+5:30

वेळेपूर्वीच दिलेली पदोन्नती अवैध ठरत असल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला.

Claim for timely promotion rejected! | कालबद्ध पदोन्नतीचा दावा फेटाळला!

कालबद्ध पदोन्नतीचा दावा फेटाळला!

Next


अकोला : कालबद्ध पदोन्नतीसाठी पात्रतेचा कालावधी होण्यापूर्वीच पदोन्नती दिल्याने तो लाभ अवैध आहे. त्यामुळे दिलेल्या पदोन्नतीचा लाभही अवैध ठरत असलेल्या वेळेपूर्वीच दिलेली पदोन्नती अवैध ठरत असल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला. त्यामुळे १९९४ ते २००० पर्यंत दिलेल्या लाभाबाबतचा अहवालही मागविण्यात आला आहे.
कुरणखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवानिवृत्त आरोग्य सहायक श्रीराम ज्योतीराम वानखडे यांना पदोन्नतीसाठी मानीव दिनांक १२ मार्च १९८८ देण्यात आला होता. त्यानंतर त्यांना १ आॅक्टोबर १९९४ रोजी कालबद्ध पदोन्नती देण्यात आली. प्रत्यक्षात त्यांना १२ मार्च २००० पासून कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देय ठरतो. वानखडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापुढे पुन्हा सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये या बाबी स्पष्ट झाल्या. त्यामुळे १९९४ ते २००० पर्यंत त्यांचा पदोन्नतीचा दावा अवैध ठरविण्यात आला. या काळात त्यांना दिल्या गेलेले लाभ अवैध असल्याने चौकशी करून अहवाल सादर करण्याचेही आदेशात बजावण्यात आले.

Web Title: Claim for timely promotion rejected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.