कार अपघातात मंडल अधिकाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 06:09 PM2021-11-24T18:09:08+5:302021-11-24T18:09:16+5:30

Circle officer killed in car accident : मंडल अधिकारी अनिल शंकरराव बेलाडकर (५४) यांचा मृत्यू झाला.

Circle officer killed in car accident | कार अपघातात मंडल अधिकाऱ्याचा मृत्यू

कार अपघातात मंडल अधिकाऱ्याचा मृत्यू

googlenewsNext

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावर येथून जवळच असलेल्या सोनोरी जवळ कारला अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत येथील मंडल अधिकारी अनिल शंकरराव बेलाडकर (५४) यांचा मृत्यू झाला. सदर घटना २४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. 
       अनिल बेलाडकर हे बुधवारी दुपारी कर्तव्यावर असताना राष्ट्रीय महामार्गाने आपल्या कार क्रमांक एमएच ३० एझेड २३९१ ने मूर्तिजापूरकडे परत येत होते, दरम्यान विरुद्ध दिशेने येत सरलेल्या अज्ञात जड वाहनाने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला. या धडकेत त्यांच्या छातीत मोठी दुखापत झाली. घटनेची माहिती कळताच त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Circle officer killed in car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.