The chairperson accepted the charge of women and child welfare | सभापतींनी स्वीकारला महिला व बालकल्याणचा पदभार
सभापतींनी स्वीकारला महिला व बालकल्याणचा पदभार

अकोला: भाजप नगरसेविका मनीषा भंसाली यांनी गुरुवारी मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाचा पदभार स्वीकारला. भाजप महिला आघाडीच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रमात पदग्रहण सोहळा पार पडला.
यावेळी भाजप महिला मोर्चा आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस अर्चना डेहणकर, अमरावती मनपाच्या उपमहापौर संध्या टिकले, अकोला जिल्हा प्रभारी सुरेखा लुगोट, सुहासिनी धोत्रे, गंगादेवी शर्मा, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष चंदा शर्मा, सीमा मांगटे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस अर्चना डेहणकर यांनी आगामी काळात शहरातील महिलांना अधिक सक्षम बनविण्यासाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित झोन समिती सभापती जयश्री दुबे, शारदा ढोरे, जान्हवी डोंगरे यांचेसुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपमहापौर वैशाली शेळके, सभागृह नेत्या गीतांजली शेगोकार, शारदा ढोरे, रंजना विंचनकर, नंदा पाटील, योगिता पावसाळे, मंगला सोनोने, आरती घोगलिया, उषा विरक, मंगला म्हैसने, विजया देशमुख, चंदा ठाकूर, सुनंदा चांदुरकर तसेच महिला व बालकल्याण अधिकारी नंदिनी दामोदर व मीना काळदाते यांची उपस्थिती होती.
 

 


Web Title: The chairperson accepted the charge of women and child welfare
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.