एमपीएससी परीक्षेच्या निकालावर उमेदवारांचा रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 02:19 PM2019-10-15T14:19:18+5:302019-10-15T14:19:34+5:30

राज्यातून ९३६ परीक्षार्थी बसले होते. केवळ ५३ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले, तर ८८३ परीक्षार्थी अनुत्तीर्ण झाले.

Candidates outraged at the result of the MPSC exam | एमपीएससी परीक्षेच्या निकालावर उमेदवारांचा रोष

एमपीएससी परीक्षेच्या निकालावर उमेदवारांचा रोष

Next

अकोला: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या वित्त आणि लेखा सेवा वर्ग ३ परीक्षेत राज्यातून ९३६ परीक्षार्थी बसले होते. त्यापैकी केवळ ५३ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले, तर ८८३ परीक्षार्थी अनुत्तीर्ण झाले. यामुळे परीक्षार्थींनी लोकसेवा आयोगाकडे धाव घेतली आहे. पेपरच्या पुनर्तपासणीची मागणी केली आहे.
राज्य लोकसेवा आयोगाने गतवर्षी वित्त व लेखा संवर्गाची परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. परीक्षेत पहिल्या पेपरमध्ये ५३ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. हे परीक्षार्थी दुसऱ्या पेपरमध्ये अनुत्तीर्ण झाले. या पेपरमध्ये सर्व परीक्षार्थींना मिळालेले गुण कमी असल्याचा दावा परीक्षार्थींनी केला आहे. या पेपरची त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून फेरतपासणी करावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार पेपर दोनमध्ये ३० टक्के सैद्धांतिक आणि ७० टक्के व्यावहारिक प्रश्न असावे; मात्र या पेपरमध्ये ७० टक्के प्रश्न सैद्धांतिक आणि ३० टक्के व्यावहारिक प्रश्न विचारण्यात आले होते. याच पेपरमध्ये कमी गुण मिळाल्याने अन्याय झाल्याचा आरोप परिक्षार्थींनी केला आहे. ही परीक्षा डिपार्मेंटल असल्याने यासाठी राज्यातील १,२३१ कर्मचारी बसले होते. ४५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन पास होणाºया कर्मचाºयांची संख्या ९ आहे. ५ गुणांची ग्रेस घेऊन उत्तीर्ण होणाºया कर्मचाºयांची संख्या २७ आहे. यामुळे हा पेपर पुन्हा तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात विभागस्तरीय कृती समितीची स्थापना करण्यात आली असून, प्रकाश बागडे यांची अध्यक्षपदी, तर विकी अघडते यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

निकाल ०.७३ टक्के
गतवर्षी झालेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. एकूण परीक्षार्थींपैकी केवळ ५२ परीक्षार्थीच उत्तीर्ण झाल्याने निकालाची टक्केवारी केवळ ०.७३ आहे. यामध्ये अमरावती विभागातून केवळ तीन ते चार परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यभरात विभागस्तरावर कृती समिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या वित्त व लेखा संवर्ग परीक्षेच्या पेपरची पुनर्तपासणी करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात विभागस्तरावर कृती समिती गठित करण्यात आली आहे. विविध कृती समितीच्या माध्यमातून पेपर पुनर्तपासणीची मागणी करण्यात येत असल्याची माहिती अमरावती विभागीय कृती समितीचे उपाध्यक्ष विकी अघडते यांनी दिली.

 

Web Title: Candidates outraged at the result of the MPSC exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.