खरेदी आणा अन् सात-बारा घेऊन जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:19 PM2020-02-21T12:19:30+5:302020-02-21T12:19:34+5:30

हा अभिनव उपक्रम अकोला तहसील कार्यालयामार्फत येत्या १ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे.

Bring a registry and pick up saat - bara | खरेदी आणा अन् सात-बारा घेऊन जा!

खरेदी आणा अन् सात-बारा घेऊन जा!

Next

- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कृषक व अकृषक जमिनीच्या सात-बारा फेरफारच्या नोंदी प्रलंबित राहू नयेत आणि सात-बारासाठी नागरिकांवर प्रतीक्षा करण्याची वेळ येऊ नये, यासाठी ‘खरेदी आणा अन् सात-बारा घेऊन जा’ हा अभिनव उपक्रम अकोला तहसील कार्यालयामार्फत येत्या १ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. कृषक व अकृषक जमिनीच्या व्यवहारानंतर मालमत्ताधारकास सात-बारा फेरफारसाठी संबंधित तलाठ्यांकडे खरेदी दिल्यानंतर तलाठ्याकडून खरेदीदारास नोटीस दिली जाते. त्यानंतर तलाठ्याकडून फेरफारची नोंद प्रमाणित करण्यासाठी संबंधिंत मंडळ अधिकाऱ्याकडे पाठविली जाते आणि पंधरा दिवसांनंतर संबंधित मालमत्ताधारकास नवीन सात-बारा देण्याची पद्धत सध्या प्रचलित आहे; परंतु सात-बारा, फेरफार नोंदीसाठी तलाठ्यांकडे प्राप्त झालेल्या खरेदी प्रलंबित राहिल्यास मालमत्ताधारकांवर फेरफार नोंदीसह नवीन सात-बारासाठी महिना-दोन महिने प्रतीक्षा करण्याची वेळ येते. त्यामुळे कृषक व अकृषक जमिनीच्या फेरफार नोंदी आणि नवीन सात-बारा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी ‘खरेदी आणा आणि सात-बारा घेऊन जा’ हा अभिनव उपक्रम अकोला तहसील कार्यालयामार्फत १ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमात तहसील कार्यालयात खरेदी घेऊन येणाºया शेतकऱ्यांसह नागरिकांना त्यांच्या जमिनीची फेरफार नोंद घेऊन त्याच दिवशी नवीन सात-बारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मंडळ अधिकाºयांकडून फेरफार नोंद प्रमाणित करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘हेल्प डेस्क’द्वारे त्याच दिवशी संबंधित खरेदीदारास नवीन सात-बारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


सात-बारा फेरफारच्या नोंदी प्रलंबित राहू नयेत आणि तातडीने नवीन सात-बारा उपलब्ध व्हावा, यासाठी हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
-विजय लोखंडे,
तहसीलदार, अकोला.

Web Title: Bring a registry and pick up saat - bara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.