तेल्हारा तालुक्यात सात हजार नागरिकांनी घेतल्या दोन्ही लस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:18 AM2021-05-14T04:18:59+5:302021-05-14T04:18:59+5:30

असे झाले लसीकरण ग्रामीण रुग्णालय तेल्हारा आतापर्यंत ६ हजार ७९८ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला, तर २ हजार ६७४ ...

Both vaccines taken by 7,000 citizens in Telhara taluka! | तेल्हारा तालुक्यात सात हजार नागरिकांनी घेतल्या दोन्ही लस!

तेल्हारा तालुक्यात सात हजार नागरिकांनी घेतल्या दोन्ही लस!

Next

असे झाले लसीकरण

ग्रामीण रुग्णालय तेल्हारा आतापर्यंत ६ हजार ७९८ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला, तर २ हजार ६७४ नागरिकांनी दुसरा डोस घेतला. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पहिला डोस १३ हजार ८९९ जणांनी घेतला, दुसरा डोस ४ हजार ३६९ जणांनी घेतला. यामध्ये कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा समावेश आहे. ज्या नागरिकांनी यापूर्वी कोव्हिशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतला असेल त्यांना सुरुवातीला २८ दिवस त्यानंतर ४५ दिवस मात्र आता १२ आठवड्यांनंतर म्हणजे तीन महिन्यानंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे, तर ज्या नागरिकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे त्यांना एक महिन्यानंतर दुसरा डोस देण्यात येईल.

ग्रामीण रुग्णालयातून माहिती मिळाली

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हे हत्यार असून, ज्या नागरिकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केल्यानंतर १५ दिवसांनी त्यांच्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढत असून, कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यास मदत होणार आहे.

- डॉ. अशोक तापडिया

अधीक्षक

दोन दिवसांत १७० पॉझिटिव्ह

तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत असून, कडक लॉकडाऊनच्या दोन दिवसांत १७० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडता, नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Both vaccines taken by 7,000 citizens in Telhara taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.