Bank not alloted Rabi crop loan! | रब्बी पीक कर्ज वाटपातही बँकांची कुचराई !
रब्बी पीक कर्ज वाटपातही बँकांची कुचराई !

- संतोष येलकर

अकोला : रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना, ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ १ हजार ५६८ शेतकºयांना १४ कोटी ५६ लाख रुपयांचे रब्बी पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपात बँकांकडून कुचराई करण्यात येत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांना १ हजार ३३४ कोटी ८३ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते; परंतु उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ ५७ हजार ९५ शेतकºयांना ४१९ कोटी ४७ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. म्हणजेच उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यात खरीप हंगामात केवळ ३१ टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांना ७० कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ १ हजार ५६८ शेतकºयांना १४ कोटी ५६ लाख रुपयांचे रब्बी पीक कर्ज वाटप करण्यात आले. कर्ज वाटपाचे अत्यल्प प्रमाण बघता, खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपात संबंधित बँकांकडून कुचराई करण्यात येत असल्याची बाब समोर येत असल्याने, जिल्ह्यातील रब्बी पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टपूर्तीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दुष्काळात शेतकरी संकटात; कर्जाचाही आधार मिळेना!
जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील सर्व गावांसह अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार महसूल मंडळातील गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात रब्बी पीक कर्ज वाटपाचे अत्यल्प प्रमाण बघता, दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला असताना रब्बी पीक कर्जाचा आधारही शेतकºयांना मिळत नसल्याची स्थिती आहे.

 रब्बी हंगामात जिल्ह्यात ७०.२८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी डिसेंबर अखेरपर्यंत बँकांमार्फत जिल्ह्यातील १ हजार ५६८ शेतकºयांना १४ कोटी ५६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
-गोपाळ मावळे
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 


Web Title: Bank not alloted Rabi crop loan!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.