अकोला जिल्ह्यात १.११ लाख शेतकऱ्यांचे खाते आधार ‘लिंक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 03:59 PM2020-02-18T15:59:13+5:302020-02-18T15:59:22+5:30

सोमवारपर्यंत १ लाख ११ हजार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आले आहे.

Bank account Link with adhar card in Akola district | अकोला जिल्ह्यात १.११ लाख शेतकऱ्यांचे खाते आधार ‘लिंक’

अकोला जिल्ह्यात १.११ लाख शेतकऱ्यांचे खाते आधार ‘लिंक’

Next

अकोला : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख १३ हजार ८४९ शेतकऱ्यांपैकी सोमवारपर्यंत १ लाख ११ हजार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आले आहे.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत गत १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख १३ हजार ८४९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांपैकी १७ फेबु्रवारीपर्यंत १ लाख ११ हजार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आले. बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आल्या आहेत. बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आले नाही, अशा शेतकºयांचा शोध घेऊन, संबंधित शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे.

 

Web Title: Bank account Link with adhar card in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.