रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न; इसमाचा पाय झाला निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 10:49 AM2021-04-04T10:49:30+5:302021-04-04T10:51:54+5:30

Attempted suicide under the train : राजू नामदेव घोगरे (५०) राहणार खापरवाड़ा असे त्या इसमाचे नाव आहे.

Attempted suicide under the train; man's legs are useless | रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न; इसमाचा पाय झाला निकामी

रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न; इसमाचा पाय झाला निकामी

Next

मूर्तिजापूर : येथील रेल्वे फलाट क्रमांक २ वर एका ५० वर्षीय इसमाने रेल्वे खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याचा उजवा पाय कायमचा निकामी झाला. ही घटना ५ एप्रिल रोजी सकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान घडली. राजू नामदेव घोगरे (५०) राहणार खापरवाड़ा असे त्या इसमाचे नाव आहे.
            सकाळी ६:३० च्या दरम्यान बडनेरा च्या दिशेने जात असलेल्या भरधाव प्रवाशी रेल्वे समोर उडी घेऊन राजू नामदेव घोगरे राहणार खापरवाड़ा यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून उजवा पाय तुटून पडला आहे. घटनेची माहिती मिळताच येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत राजू घोगरे यांना तातडीने येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.

Web Title: Attempted suicide under the train; man's legs are useless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.