पातूर पंचायत समितीच्या आवारात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 12:11 PM2021-05-10T12:11:44+5:302021-05-10T12:16:27+5:30

Akola News : पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे अनर्थ टळला.

Attempt of self-immolation of youth in the premises of Pathur Panchayat Samiti | पातूर पंचायत समितीच्या आवारात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

पातूर पंचायत समितीच्या आवारात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Next

खेट्री : अपहार करणाऱ्या सचिव यांच्यावर कारवाई होत नसल्याने अखेर सायवणी येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार बळीराम ताले यांनी सोमवार, १० मे रोजी ११: १५ वजताच्या सुमारास पातुर पंचायत समितीच्या आवारात "आत्मदहन" करण्याचा प्रयत्न केला; परंतु उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना त्वरित ताब्यात घेतले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. विजय ताले यांचा तालुक्यातील पातूर आणि चान्नी या दोन पोलीस स्टेशनची पोलीस शोध घेत होती.पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार अनुचित प्रकार घडू नये यासाठी विजय ताले यांना ताब्यात घेण्यासाठी पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरिष गवळी व चान्नी पोलीस स्टेशनचे राहुल वाघ यांनी पोलिसांचा कडक बंदोबस्त लावला होता. सावरगाव झरंडी ग्रामपंचायतच्या विकास कामांमध्ये अपहार केल्याची चौकशी करण्यास संबंधितांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत सायवणी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार बळीराम ताले यांनी सोमवारी १० मे रोजी पातूर पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात "आत्मदहन" करण्याचा इशारा ५ मे रोजी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या स्मरण पत्रातून दिला होता. अपहार केल्याप्रकरणी चौकशीत दोषी आढळल्यास निश्चितच कारवाई करू "आत्मदहन" थांबवा अशी विनंती पातूरचे गटविकास अधिकारी अनंता लव्हाळे यांनी ८ मे रोजी दिलेल्या पत्रकाद्वारे केली होती. परंतु विजयकुमार ताले यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, १० मे रोजी त्यांनी पातूर पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात "आत्मदहन" करण्याचा प्रयत्न केला. सावरगाव ग्रामपंचायतचे तत्कालीन सचिव यांनी अपहार केल्याचा आरोप निवेदनातून विजयकुमार ताले यांनी केला होता. परंतु संबंधितांकडून अद्यापही दखल किंवा चौकशी केली नाही. त्यामुळे १५ दिवसाच्या आत चौकशी करून तत्कालीन सचिवावर कारवाई करा अन्यथा गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाच्या आवारात "आत्मदहन" करण्याचा इशारा दिला होता. याबाबत पुन्हा ५ मे रोजी स्मरण पत्रव्दारे आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.२० दिवसाची कालावधी उलटूनही कारवाई केली नाही. त्यामुळे सोमवारी १० मे रोजी विजयकुमार ताले यांनी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला ,पातूर व चान्नी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून,आत्मदहन करण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.यावर काय कारवाई होते.याकडे पातूर तालुकावसियांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Attempt of self-immolation of youth in the premises of Pathur Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.