२४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 02:22 PM2020-02-16T14:22:07+5:302020-02-16T14:22:19+5:30

शनिवारपर्यंत जिल्ह्यातील २४ हजार ३३४ शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

Assistance amount submited in the farmers account! | २४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा!

२४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा!

googlenewsNext

अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी तिसºया टप्प्यात प्राप्त झालेली मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, शनिवारपर्यंत जिल्ह्यातील २४ हजार ३३४ शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे.
अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्याच्या तिसºया टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपयांची मदत शासनामार्फत १ फेबु्रवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. उपलब्ध मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी शेतकºयांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमार्फत बँकांमध्ये जमा करण्यात आले असून, मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया बँकांमार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये शनिवार, १५ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २४ हजार ३३४ शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यात ३ हजार ९८६, बार्शीटाकळी तालुक्यात ४ हजार ४९०, अकोट तालुक्यात ३ हजार २०, तेल्हारा तालुक्यात ६ हजार १५३, बाळापूर तालुक्यात ४ हजार ९५६, पातूर तालुक्यात १ हजार ३५३ व मूर्तिजापूर तालुक्यात ३७६ शेतकºयांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

 

Web Title: Assistance amount submited in the farmers account!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.