आणखी एकाचा मृत्यू, २२८ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 03:10 PM2021-03-23T15:10:10+5:302021-03-23T15:10:25+5:30

CoronaVirus in Akola २३ मार्च रोजी जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४२८ झाला आहे.

Another died, 228 corona positive | आणखी एकाचा मृत्यू, २२८ कोरोना पॉझिटिव्ह

आणखी एकाचा मृत्यू, २२८ कोरोना पॉझिटिव्ह

Next

अकोला : कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे सत्र सुरुच असून, मंगळवार, २३ मार्च रोजी जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४२८ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १३१, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ९७ असे एकूण २२८ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण बाधितांचा आकडा २५,००४ वर पोहोचला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून  मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ७५१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ६२० अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये शास्त्रीनगर येथील सात, जीएमसी आणि अकोट येथील पाच, तारफैल, शिवनी, बोरगाव मंजू, बाळापूर, मुर्तिजापूर येथील प्रत्येकी चार, वाठुळकर लेआऊट, रणपिसेनगर, मोरगाव भाकरे, गीता नगर, अंत्री, मोठी उमरी व खदान येथील प्रत्येकी तीन, हरिहर पेठ, लोकमान्य नगर, वानखडे नगर, आळशी प्लॉट, मलकापूर, आनंदनगर, खडकी, बार्शी टाकळी, सांगळूद, बाभुळगाव, न्यू भिमनगर, नवरंग सोसायटी, डीएसपी ऑफिस, दुधलम व गड्डम प्लॉट येथील प्रत्येकी दोन, तसेच अनिकट, रामी हेरीटेज, केशवनगर, चिखली रोड, उगवा, न्यू खेतान नगर, माझोड, मुंडगाव, देशमुख फैल, पंचगव्हाण, निंबी मालोकार, पुनोती, वरोडी, शिवर, दहिगाव गावंडे, साईनगर, केडीया प्लॉट, जठारपेठ, माता नगर, गुरुदत्त नगर, आश्रय नगर, बाळापूर नाका, सावरगाव, जुना आंदुरा, महाकाली नगर, भवानी नगर, पिंजर, जवाहर नगर, डाबकी रोड, टेलिफोन कॉलनी, सुकळी, तेल्हारा, धरसोडी, बलवंत कॉलनी, न्यु खेतान नगर, जुने शहर, अडगाव, हसनापूर ता. बाळापुर, महसूल कॉलनी, जिल्हा स्त्री रुग्णालय क्वार्टर, केळकर हॉस्पिटल, पिंपळगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

३२ वर्षीय युवकाचा मृत्यू

गवळीपुरा येथील रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या रुग्णास २२ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

 

६,४१० ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २५,००४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १८,१६६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४२८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,४१० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another died, 228 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.