अकोला जिल्ह्यात आणखी १९६ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:10 PM2021-02-22T16:10:29+5:302021-02-22T16:10:52+5:30

CoronaVirus in Akola एकूण १९६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १४,१३१ वर पोहोचली आहे.

Another 196 corona positive in Akola district | अकोला जिल्ह्यात आणखी १९६ कोरोना पाॅझिटिव्ह

अकोला जिल्ह्यात आणखी १९६ कोरोना पाॅझिटिव्ह

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाच कहर सुरुच असून, सोमवार, २२ फेब्रुवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १६५, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये ३१ असे एकूण १९६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १४,१३१ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५०३ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३३८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापूर येथील २८, अकोट येथील २०, जीएमसी व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी आठ, कान्हेरी सरप व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, देवरावबाबा चाळ, कौलखेड, खडकी, मोठी उमरी, डाबकी रोड व उगवा येथील प्रत्येकी चार, आदर्श कॉलनी, रामदास पेठ, न्यु तापडीया नगर, सुधीर कॉलनी व गिता नगर येथील प्रत्येकी तीन, तापडीया नगर, मलकापूर, केशव नगर, सिंधी कॅम्प, अमृतवाडी,दगडी पूल, बलोदे लेआऊट, गजानन पेठ, मराठा नगर, बाजोरीया नगर व अकोट येथील प्रत्येकी दोन, उरळ, एपीएमसी मार्केट, गोकूळ कॉलनी, रवी नगर, विद्या नगर, जूने शहर, निबंधे प्लॉट, गंगाधर प्लॉट, चांदुर, तोष्णीवाल लेआऊट, सातव चौक, शिवाजी नगर, गड्डम प्लॉट, व्दारका नगर, खोलेश्वर, गजानन नगर, अजिंक्य नगर, अकोट फैल, खदान नाका, राऊतवाडी, लहरीया नगर, मलकापूर, गंगा नगर, राजपूतपुरा, निमवाडी, सिंदखेड ता. बार्शीटाकळी, माना ता.मुर्तिजापूर, कृष्ण नगरी, पैलपाडा बोरगाव मंजू व माणिक टॉकीज येथील प्रत्येकी एक अशा १६५ रुग्णांचा समावेश आहे.

रॅपिड चाचण्यांमध्ये ३१ पॉझिटिव्ह

रविवार २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या ३३९ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ३१ जण पॉझिटिव्ह आढळून आले. आतपर्यंत झालेल्या एकूण ३४,३२० चाचण्यांमध्ये २४३३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

२,१९३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १४,१३१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,५८५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३५३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत २,१९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 196 corona positive in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.