मनूताई शाळेच्या विद्यार्थिनींनी बनविला संकटात मदत करणारा ‘रोबोट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:23 PM2019-12-18T12:23:02+5:302019-12-18T12:29:09+5:30

या स्पर्धेत विद्यार्थिनींनी बनविलेल्या रोबोटची निवड झाली तर या विद्यार्थिनींना अमेरिकेत जाण्याची संधी मिळणार आहे.

Akola's girl student made 'Robot' to help in crisis | मनूताई शाळेच्या विद्यार्थिनींनी बनविला संकटात मदत करणारा ‘रोबोट’!

मनूताई शाळेच्या विद्यार्थिनींनी बनविला संकटात मदत करणारा ‘रोबोट’!

Next
ठळक मुद्दे रोबोट बनविणाºया या विद्यार्थिनी मराठी माध्यमात शिकत असून, त्यांचे आई-वडील शेतमजुरी करतात. रोबोटची निवड झाली तर या विद्यार्थिनींना अमेरिकेत जाण्याची संधी मिळणार आहे.लिगो एज्युकेशन आॅर्गनायझेशनने विद्यार्थिनींना रोबोट बनविण्यासाठी साहित्य पुरविले.

- नितीन गव्हाळे 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: आई-वडील शेतमजुरी करणारे, प्रसंगी गावावरून शाळेत पायी येणाऱ्या, मराठी माध्यमात शिकणाºया विद्यार्थिनींनी कमाल केली आहे. नामांकित शाळांमधील विद्यार्थ्यांना तोंडात बोटे घालायला लावत, मनूताई कन्या शाळेच्या इयत्ता आठवी व नववीतील विद्यार्थिनींनी तहान-भूक विसरून सतत तीन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर दैनंदिन समस्यांचे निराकरण करणारा ‘रोबोट’ बनविला आहे. या रोबोटची फर्स्ट लिगो लीगसाठी निवड झाली असून, या स्पर्धेत विद्यार्थिनींनी बनविलेल्या रोबोटची निवड झाली तर या विद्यार्थिनींना अमेरिकेत जाण्याची संधी मिळणार आहे.

मुंबई लिगो एज्युकेशन ही आॅर्गनायझेशन दरवर्षी फर्स्ट लिगो लीगचे आयोजन करीत असते. या लीगमध्ये यंदा शहरातील समस्या आणि त्याचे निराकरण हा विषय घेतला असून, ही स्पर्धा १८ व १९ जानेवारी रोजी मुंबईला होणार आहे. या लीगमध्ये मनूताई कन्या शाळेतील १४ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. त्यासाठी लिगो एज्युकेशन आॅर्गनायझेशनने विद्यार्थिनींना रोबोट बनविण्यासाठी साहित्य पुरविले. या विद्यार्थिनींना किट्सच्या संचालक व रोबोटिक्सच्या तज्ज्ञ काजल राजवैद्य, शिक्षक विजय भट्टड यांनी तसेच त्यांच्या सामाजिक बांधीलकी विभागानेसुद्धा मार्गदर्शन व मदत केली. या विद्यार्थिनींनी अत्यंत कल्पकतेने छोट्या पाटर््सचा वापर करून रोबोट तयार केला असून, त्याचे डिझाइन, प्रोग्रॅमिंग स्वत: तयार केले आहे. एकही दिवस सुटी न घेता, या विद्यार्थिनींनी रोबोटची निर्मिती केली. रोबोट बनविणाºया या विद्यार्थिनी मराठी माध्यमात शिकत असून, त्यांचे आई-वडील शेतमजुरी करतात. शहरालगतच्या छोट्या गावांमधून येणाºया विद्यार्थिनींकडे आॅटोरिक्षाने शाळेत यायलासुद्धा पैसे नसतात. बºयाचदा या विद्यार्थिनी शाळेत पायी येतात. रोबोटच्या उपयोगिता सांगण्यासाठी विद्यार्थिनींनी अत्यंत मेहनत घेतली असून, इंग्रजीमध्ये त्यांनी छान मांडणी केली आहे. या विद्यार्थिनींना मुख्याध्यापिका डॉ. वर्षा पाठक यांचेही मार्गदर्शन लाभले.


काय काम करतो ‘रोबोट’!
विद्यार्थिनींनी बनविलेला रोबोट ट्रॅफिक जाम, नैसर्गिक आपत्ती, संकटात सापडलेल्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याचे काम करतो. यासोबतच झाडांवर ट्री हाउस तयार करण्याचे काम करतो. क्रेन चालविण्यासाठी, बांधकाम साहित्य, मटेरियल्स पोहोचविण्यासाठीसुद्धा रोबोटची मदत होते. याशिवाय हा रोबोट उंचीवरसुद्धा चढू शकतो.

या विद्यार्थिनींनी बनविला ‘रोबोट’!
शहरातील ११0 वर्षे जुन्या मनूताई कन्या शाळेत शिकणाºया रुचिका मुंडाले, निकिता वसतकार, स्नेहल गवई, अर्पिता लंगोटे, सानिका काळे, गौरी झामरे, आंचल दाभाडे, पूजा फुरसुले, सायली वाकोडे, अंकिता वजिरे, समीक्षा गायकवाड, प्रांजली सदांशिव, गायत्री तावरे, प्रणाली इंगळे यांनी सांघिक भावनेतून हा रोबोट बनविला आहे.

 

Web Title: Akola's girl student made 'Robot' to help in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.