अकोल्यावर जलसंकट ; कृत्रिम पावसासाठी अनुकूल वातावरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 04:37 PM2019-08-28T16:37:44+5:302019-08-28T16:37:50+5:30

कृत्रिम पावसाचा प्रयोग काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात राबविल्यास अकोलेकरांना पाणी मिळण्याची शक्यता आहे

Akola water crisis; A favorable environment for artificial rain! | अकोल्यावर जलसंकट ; कृत्रिम पावसासाठी अनुकूल वातावरण!

अकोल्यावर जलसंकट ; कृत्रिम पावसासाठी अनुकूल वातावरण!

googlenewsNext

अकोला : अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात अल्प जलसाठा असल्याने साडे आठ लाख अकोेलेक रांवर जलसंकट उभे ठाकले आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात राबविल्यास अकोलेकरांना पाणी मिळण्याची शक्यता आहे. सध्या वातावरणही अनुकूल असल्याने हा प्रयोग येथे राबविण्याची मागणी होत आहे.
काटेपूर्णा धरणाचे पाणलोट क्षेत्र वाशिम जिल्ह्यातील काटा येथे आहे; परंतु काटानंतर छोटे-मोठे १२ प्रकल्प असून, या प्रकल्पातही अपेक्षित साठा झाला नसल्याने पाणलोट क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी काटेपूर्णा धरणात पोहोचणे कठीण आहे. याकरिता पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची गरज आहे.
अकोला, बुलडाणा व अमरावती या तीन जिल्ह्याच्या सीमेवर सातपुडा पर्वत रांगांच्या कुशीत वसलेल्या वान धरणात ८३.५६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पातूर तालुक्यातील निर्गुणा धरणात आजमितीस १५.९८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. याच तालुक्यातील मोर्णा धरणाची अवस्थाही अशीच होती. आजमितीस २२.४१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील धरणात १०.५३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. याच तालुक्यातील घुंगशी बॅरेजचा जलसाठाही शून्य टक्के होता. आजमितीस ०.५८ टक्के पाणी उपलब्ध आहे. एकूणच जिल्ह्यातील वान सोडले तर सर्वच धरणात अत्यंत अल्प जलसाठा उपलब्ध आहे. पावसाळ््याचे तीन महिने संपत आले आहेत. तथापि, आवश्यक जलसाठा उपलब्ध झाला नाही. काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पूरक पाऊस पडलाच नसल्याने या धरणात आजमितीस ९.३५ टक्केच जलसाठा उपलब्ध झाला आहे. आता पावसाचे दिवस संपत आल्याने साडे आठ लाख अकोलेकरांची चिंता वाढली आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाने दखल घेत काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीचा प्रस्ताव तयार करू न शासनाला पाठविण्याची गरज आहे. सध्या कृत्रिम पावसासाठी वातावरण अनुकूल असल्याने पाऊस पाडणेही शक्य होणार आहे. मराठवाड्यात हा प्रयोग यशस्वी झाला असून, एका तालुक्यात दीड तास पाऊस पडला. हाच प्रयोग येथेही राबविण्याची गरज आहे.

 पावसाळा आणखी एक महिना असल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग येथे राबविण्यासाठीचा अद्याप विचार नाही तसा प्रस्ताव तयार केला नाही.
जितेंद्र पापळकर,
जिल्हाधिकारी, अकोला.

 

Web Title: Akola water crisis; A favorable environment for artificial rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.