अकोला :‘जीएमसी’चे दुसऱ्यांदा स्ट्रक्चरल ऑडिट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 01:59 PM2020-01-07T13:59:30+5:302020-01-07T13:59:36+5:30

, डिसेंबरमध्ये पथकाने दुसऱ्यांदा स्ट्रक्चर आॅडिट केल्याची माहिती जीएमसी प्रशासनाने दिली.

Akola: 'GMC' second structural audit! | अकोला :‘जीएमसी’चे दुसऱ्यांदा स्ट्रक्चरल ऑडिट!

अकोला :‘जीएमसी’चे दुसऱ्यांदा स्ट्रक्चरल ऑडिट!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : दोन महिन्यांपूर्वी नागपूर येथील व्हीएनआयटीच्या पथकाने सर्वाेपचार रुग्णालयाच्या जुन्या इमारतींचे स्ट्रक्चर आॅडिट केले होते. त्यावेळी रुग्णालयातील १९२७ मध्ये बांधलेल्या जुन्या इमारतीसह इतर चार इमारती धोकादायक असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु अद्यापही तसा अहवाल पथकाकडून जीएमसीला मिळाला नाही. दरम्यान, डिसेंबरमध्ये पथकाने दुसऱ्यांदा स्ट्रक्चर आॅडिट केल्याची माहिती जीएमसी प्रशासनाने दिली.
सर्वोपचार रुग्णालयातील ९२ वर्षे जुन्या इमारतीसह इतर चार इमारतींचे स्ट्रक्चर आॅडिट ३ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ‘व्हीएनआयटी’ मार्फत इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट करण्यात आले होते. त्यावेळी ‘व्हीएनआयटी’चे प्रा. इंगळे आणि प्रा. व्यवहारे यांनी पाचही इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे स्पष्ट केले. या पाचही इमारती सर्वोपचार रुग्णालयाचा कणा असून, याच इमारतींमध्ये दररोज हजारो रुग्णांवर उपचार केला जातो. सार्वजनिक बांधकाम विभागाला स्ट्रक्चर आॅडिटचा अधिकृत अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. अशातच डिसेंबर महिन्यात पुन्हा तज्ज्ञांकडून इमारतींच्या धोकादायक भागाचा आढावा घेण्यात आला. पहिल्या आॅडिटनंतर सुमारे ८ ते १० दिवसात तज्ज्ञांचा अहवाल येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; मात्र दुसºयांदा तज्ज्ञांनी भेट देऊनही अहवालाची प्रतीक्षा कायम आहे.

इमारतीचे घेतले मटेरियल सॅम्पल
व्हीएनआयटीच्या पथकाने दुसºयांदा भेटीदरम्यान सर्वोपचार रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी इमारतीचे काही मटेरियल सॅम्पल तपासणीसाठी घेतल्याची माहिती आहे.

सर्वोपचार रुग्णालयाच्या जुन्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे दुरुस्तीसंदर्भात प्रशासनातर्फे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. तज्ज्ञांकडून इमारतींची पाहणी करण्यात आली आहे. लवकरच अहवाल प्राप्त होऊन नव्याने बांधकाम किंवा दुरुस्तीसंदर्भात योग्य तो निर्णय होईल.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी

Web Title: Akola: 'GMC' second structural audit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.