अकोला : ‘जीएमसी’ प्रशासनाला पास प्रणालीचा विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 02:14 PM2020-02-25T14:14:43+5:302020-02-25T14:14:57+5:30

अस्वच्छतेसोबतच इतर समस्याही वाढल्या असून, प्रशासनाला पास प्रणालीचा विसर पडला आहे.

Akola GMC administration Forget pass system! | अकोला : ‘जीएमसी’ प्रशासनाला पास प्रणालीचा विसर!

अकोला : ‘जीएमसी’ प्रशासनाला पास प्रणालीचा विसर!

Next

अकोला : सर्वोपचार रुग्णालयात दाखल रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाइकांसाठी २०१८ मध्ये पास प्रणालीला सुरुवात करण्यात आली होती. काही दिवसांतच ही प्रणाली ठप्प पडल्याने रुग्णांपेक्षा त्यांना भेटायला येणाºया नातेवाइकांचीच संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे अस्वच्छतेसोबतच इतर समस्याही वाढल्या असून, प्रशासनाला पास प्रणालीचा विसर पडला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अकोला जिल्हा व लगतच्या इतरही जिल्ह्यांमधून रुग्ण उपचारासाठी भरती होतात. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांसोबत ५ ते ६ नातेवाईक असतात. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला रुग्णसेवा देणे, साफसफाई ठेवणे अडचणीचे ठरते. यासाठी १ मे २०१८ पासून राज्यातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना पास प्रणाली सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार रुग्णासोबत आलेला नातेवाईक व भेटावयास येणाºया नातेवाइकांजवळ पास असेल, तरच त्यांना रुग्णाला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती; परंतु ही प्रणाली पूर्णत: ठप्प पडल्याने येथे रुग्णांपेक्षा नातेवाइकांचीच संख्या जास्त झाली आहे. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असून, अस्वच्छता अन् इतर समस्याही वाढल्या आहेत. असे असले तरी यावर अंकुश लावण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून नव्याने पास प्रणाली सुरू करण्यासाठी प्रयत्न होत नाहीत.

अशी होती पास प्रणाली
पिवळी पास
रुग्ण भरती झाल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या दोन नातेवाइकांना प्रत्येकी एक, अशा दोन पिवळ्या रंगाच्या पास दिल्या जात होत्या. ही पास रुग्ण भरती झाल्यापासून तीन दिवस वैध राहायची. गरज भासल्यास पास नूतणीकरणाची सुविधा होती.

गुलाबी पास
रुग्णांना भेटण्यासाठी येणाºया नातेवाइकांना गुलाबी रंगाची पास होती. दोन नातेवाइकांना ही पास देण्यात येत होती. याद्वारे सायंकाळी ४ ते ५ या वेळेत रुग्णांना भेटणे शक्य होते. ही पासदेखील तीन दिवस वैध होती.

यासाठी ‘पास प्रणाली’ आवश्यक

  • ‘जीएमसी’त गर्दीमुळे वाढल्यात अनेक समस्या.
  • अस्वच्छता, दुर्गंधी अन् पाण्याचा वाढता वापर.
  • अपुºया मनुष्यबळावर वाढता ताण.
  • रुग्णसेवा प्रभावित.
  • डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न वाढला.

 

Web Title: Akola GMC administration Forget pass system!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.