Akola City : पुन्हा अनलॉक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 10:11 AM2020-07-21T10:11:27+5:302020-07-21T10:11:33+5:30

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लावण्यात आलेला तिन दिवसांचा लॉकडाऊन सोमवारपासून खुला होत आहे.

Akola City: Unlocked again! | Akola City : पुन्हा अनलॉक!

Akola City : पुन्हा अनलॉक!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लावण्यात आलेला तिन दिवसांचा लॉकडाऊन सोमवारपासून खुला होत आहे. दरम्यान, अकोला शहराच्या तुलनेत अकोट आणि तेल्हारा या दोन तालुक्यामध्ये कोरोनाचा उद्रेक वाढला असल्याने येथील लॉकडाऊन २२ जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
अकोल्यातील बाजारपेठ सोमवारपासून खुली होत असली तरी सम विषम व दिशेनुसार दूकाने सुरू करण्याबाबत यापूर्वी असलेले नियम कायम आहेत. भविष्या पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे अन्यथा कोरोनाचा उद्रेक झाल्यास लॉकडाऊनशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही.
कोरोना प्रतिबंधासाठी खरे तर लॉकडाऊन हा एक मार्ग आहे; मात्र तो एकमेव मार्ग नाही.
अनलॉकच्या पहिल्या टप्यात सम-विषमचा नियम असो की इतर प्रतिबंधात्मक नियमांचे पालन फारसे झाले नाही, याचीही नोंद सर्वच नागरिकांनी घेतली पाहिजे. या तिन दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये लोकांचा प्रतिसाद उत्तमच मिळाला.
फक्त या प्रतिसादाला आणखी बळ देण्यासाठी आता रोजच्या व्यवहारात नियम पाळण्याची गरज आहे.


या गोष्टी बंदच राहतील?

  • शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास
  • रेल्वेची नियमित वाहतूक
  • सिनेमाघरे, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार आणि आॅडिटोरियम, कार्यक्रमाचे सभागृह हॉल आणि तत्सम ठिकाणे.
  • कोणत्याही स्वरूपाचा सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, अभ्यासविषयक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम
  • विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे
  • शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट तसंच अन्य हॉस्पिटॅलिटी केंद्र
  • सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन कोणताही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नाही.

 

Web Title: Akola City: Unlocked again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.