अकाेलेकरांना गांभीर्य नाही; ५५ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 10:12 AM2021-02-23T10:12:01+5:302021-02-23T10:12:13+5:30

Akola News नियमांना धाब्यावर बसविणाऱ्या १९० नागरिकांसह चार व्यावसायिकांकडून महापालिकेने साेमवारी ५५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला.

Akola citizens has no seriousness; A fine of Rs 55,000 was recovered | अकाेलेकरांना गांभीर्य नाही; ५५ हजारांचा दंड वसूल

अकाेलेकरांना गांभीर्य नाही; ५५ हजारांचा दंड वसूल

Next

अकाेला: शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असतानादेखील अकाेलेकरांना गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे. घराबाहेर निघताना ताेंडाला मास्क लावणे अनिवार्य केल्यानंतरही नागरिकांना नियमांचा विसर पडताे कसा, असा सवाल उपस्थित हाेत आहे. नियमांना धाब्यावर बसविणाऱ्या १९० नागरिकांसह चार व्यावसायिकांकडून महापालिकेने साेमवारी ५५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला.

शहरात काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना अकाेलेकर बिनधास्त फिरत असल्याचे दिसत आहे. संशयित रुग्णांनी काेराेनाच्या चाचणीकडे पाठ फिरविल्यामुळे काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १५ फेबुवारीपासून शहरासह जिल्ह्यात जमावबंदी लागू केली. तसेच २३ फेब्रुवारीपासून टाळेबंदी लागू केली आहे. काेराेनाच्या नियमांचे नागरिकांकडून उल्लंघन केले जात असल्याचे पाहून महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी मास्क न लावणाऱ्या व साेशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविराेधात कारवाईचे निर्देश जारी केले आहेत. साेमवारी मनपा, पाेलीस व महसूल प्रशासनाच्या संयुक्त पाच पथकांनी १९० नागरिकांसह चार व्यावसायिकांजवळून ५५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला.

Web Title: Akola citizens has no seriousness; A fine of Rs 55,000 was recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.