अकोला : ७४ शिक्षकांच्या बदलीचा घोळ पुन्हा ऐरणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 12:19 PM2020-03-11T12:19:26+5:302020-03-11T12:19:36+5:30

आंतरजिल्हा बदली करू नये, असा आदेश असताना ८० पेक्षाही अधिक शिक्षकांना रुजू करून घेण्यात आले.

Akola: ७४ Teacher's transfers issue on fray now | अकोला : ७४ शिक्षकांच्या बदलीचा घोळ पुन्हा ऐरणीवर!

अकोला : ७४ शिक्षकांच्या बदलीचा घोळ पुन्हा ऐरणीवर!

googlenewsNext

- सदानंद सिरसाट  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आॅगस्ट २०११ ते मार्च २०१३ या कालावधीत शिक्षकांच्या नियमबाह्य आंतरजिल्हा बदल्या मोठ्या प्रमाणात केल्याचा फास आता अधिकाऱ्यांच्या गळ््यात आवळला जात आहे. त्यापैकी ७४ शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्यांसाठी तीन शिक्षणाधिकाऱ्यांसह एका अधीक्षकाची खातेनिहाय चौकशी सुरू झाली. त्यासाठी तत्त्कालिन शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे, प्रफुल्ल कच्छवे, अनिल तिजारे यांच्यासह अधीक्षक टी.के.अघडते यांना ७४ शिक्षकांच्या नियमबाह्य बदलीसंदर्भात स्पष्टीकरण मागवण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आंतरजिल्हा बदलीने एकतर्फी, आपसी पद्धतीने मोठ्या प्रमाणात शिक्षकांना रुजू करून घेण्यात आले.
विभागीय आयुक्तांचा आंतरजिल्हा बदली करू नये, असा आदेश असताना ८० पेक्षाही अधिक शिक्षकांना रुजू करून घेण्यात आले. या घोटाळ््याची चौकशी विभागीय आयुक्तांच्या पथकाने केली. त्यामध्ये अधिकाºयांवर ठपका ठेवण्यात आला.

Web Title: Akola: ७४ Teacher's transfers issue on fray now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.