सिंचन क्षेत्रासोबतच उत्पादकता वाढवावी लागेल! - जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 07:53 PM2020-01-19T19:53:43+5:302020-01-19T19:58:19+5:30

आंतरराष्टÑीय जल सिंचन व जल निस्सारण आयोगाचे माजी सरकार्यवाह डॉ.माधवराव चितळे अकोल्यात आले असताना ‘लोकमत’शी बातचित करताना त्यांनी पाणी विषयावर सर्वच अनुषंगाने माहिती दिली.

In addition to the irrigation sector, productivity has to be increased! - Dr. Madhavrao chitale | सिंचन क्षेत्रासोबतच उत्पादकता वाढवावी लागेल! - जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे 

सिंचन क्षेत्रासोबतच उत्पादकता वाढवावी लागेल! - जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे 

googlenewsNext

 

- राजरत्न सिरसाट

अकोला : सिंचन क्षेत्रात वाढ होत असून, सिंचन आयोगाच्या अहवालाच्या आकडेवारीवरू न हे समोर आले आहे.आता  प्रतिघनमिटर  पाण्याची उत्पादकता वाढवणे हे खरे काम आहे. तदव्तच पाणी व्यवस्थापन काळाची गरज असल्याने लोकांचा सहभाग व जागरू कता वाढवावी लागणार आहे. सिंचन परिषदेतून हाच संदेश देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आंतरराष्टÑीय जल सिंचन व जल निस्सारण आयोगाचे माजी सरकार्यवाह डॉ. माधवराव चितळे यांनी रविवारी दिली.

दोन दिवसीय २० वी महाराष्ट्र सिंचन परिषद येथे आयोजित करण्यात आली होती,या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी डॉ. चितळे अकोल्यात आले असताना ‘लोकमत’शी बातचित करताना त्यांनी पाणी विषयावर सर्वच अनुषंगाने माहिती दिली. 


 - सिंचनाचा तर अनुशेष आहे ?
उत्तर-  सिंचन आयोगाच्या ताज्या अहवालानुसार सिंचनाचे क्षेत्र वाढत असल्याचे समोर आले आहे. विदर्भातही या अनुषंगाने काम होत आहे पंरतु खरी गरज आहे ती भूपृष्ठावर पावसाचे पाणी साठविण्याची.ती क्षमता आपण निर्माण न केल्याने पावसाचे पाणी समुद्राकडे वाहून जात आहे.आजमितीस आपण केवळ ३० टक्के पाण्याचा साठा करू  शकलो. 


- पाणी साठविण्यासाठी काय करावे?
उत्तर- साठे तयार करावे लागणार आहेत.तदव्तच मुलस्थानी जलसंवर्धनही करावे लागेल.राहणीमान बदलले असून, पाण्याचा वापर वाढला आहे.शेती,उद्योग आदी विकासाला वर्षाकाठी किती पाणी लागते याचा ताळेबंद ठेवावा लागणार आहे. 


- जलप्रदुषणावर उपाययोजना अपुºया पडतात का ?
उत्तर- हे प्रशासकीय आव्हान आहे. यासाठी कडक कायदे करण्यात आले आहेत.त्याचा वापर केला पाहिजे.नद्या,ओढे, तलाव आदी ठिकाणी लोकांनी कचरा,घाण टाकणे टाळले पाहिजे ,नद्याच्या काठचे अतिक्रमण काढून नद्यांचा श्वास मोकळा करणे तेवढेच अत्यावश्यक आहे. त्यासाठी लोकांनी पाण्यावर प्रेम करावे,त्यासाठीची जनजागृती करावी लागणार असून, शहर ते ग्राम पातळीवर विविध समित्या स्थापन कराव्या.या समित्यांचे संचालन जिल्हा परिषद,पंचायत समित्या,ग्राम पंचायतीमार्फत होणे गरजेचे आहे.व्यापक स्वरू पात जनजागृती होईल.


-  खारपाणपट्टयासाठी कोणत्या उपाययोजना राबवाव्यात?
उत्तर- विदर्भातील खारपाणपट्ट्यात नवीन स्वच्छ पावसाचे पाणी मुलस्थानी साठवणूक व जिरवावे लागले.


- जलतिनीचा फायदा झाला का?
 उत्तर- पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांनी पहिली जलनिती ठरविण्यासाठी पुढाकार घेतला होता.त्याचा फायदा झाला आहे.आता खरी गरज आहे ती भूपृष्ठावर पाणी वाढविण्याची.त्यांनतर दुसरी जलनिती ठरविण्यात आली त्यामध्ये किरकोळ बदल करण्यात आले.

Web Title: In addition to the irrigation sector, productivity has to be increased! - Dr. Madhavrao chitale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.