मास्क न घालणाऱ्या ऑटो चालकांविरुद्ध धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 05:43 PM2020-09-28T17:43:43+5:302020-09-28T17:44:25+5:30

दिवसभरात तब्बल २०० चे वर मास्क न घालणाऱ्या  किंवा मास्क शिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Action taken against auto drivers who do not wear masks | मास्क न घालणाऱ्या ऑटो चालकांविरुद्ध धडक कारवाई

मास्क न घालणाऱ्या ऑटो चालकांविरुद्ध धडक कारवाई

Next

अकोला : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व शासनाची माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नो मास्क नो सवारी ही मोहीम वाहतूक पोलिसांनी सुरू केली. त्या अंतर्गत दोन दिवस ऑटो चालकांची स्ट्रीट मीटिंग घेऊन त्यांना करोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वत: मास्क घालण्याचे व ऑटोतुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा मास्क घालण्याचा आग्रह करून मास्क न घालणाºया सवारीसाठी आॅटो उपलब्ध न करून देण्याचे आवाहन व निर्देश दिले होते. त्या नंतरचे दोन दिवस शहरात धावणाऱ्या ऑटोवर नो मास्क नो सवारी , माझे कुटुंब माझी जबाबदारी , असे लिहलेले पोस्टर्स लावण्यात आल्यावर सोमवारी पोलीस निरीक्षक गजानन शेळके कर्मचार्यांसह रस्त्यावर उतरून नो मास्क नो सवारी चे निर्देश न पाळणाऱ्या ऑटो चालकांवर धडक कारवाया सुरू केल्या. एकाच वेळी गांधी चौक, कोतवाली चौक, टॉवर चौक, धिंग्रा चौक या गजबजलेल्या चौकात वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू करताच ऑटो चालकांची तारांबळ उडाली. ऑटो चालक स्वत: मास्क घालून ऑटोत बसलेल्या प्रवाश्यांना सुद्धा मास्क घालण्याचा आग्रह करतांना दिसत होते. तरी सुद्धा दिवसभरात तब्बल २०० चे वर मास्क न घालणाऱ्या  किंवा मास्क शिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशी कारवाई दररोज सुरू राहणार असल्याने ऑटो चालकांनी स्वत: हुन नो मास्क नो सवारी 'ा मोहिमेत सामील होऊन करोना पासून बचाव करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी केले आहे.

Web Title: Action taken against auto drivers who do not wear masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.