Action against Only four out of 22 schools for showing bogus papers | बोगस पटसंख्या दाखविणाऱ्या २२ पैकी केवळ चार शाळांवर फौजदार कारवाई!
बोगस पटसंख्या दाखविणाऱ्या २२ पैकी केवळ चार शाळांवर फौजदार कारवाई!

अकोला: राज्यभरामध्ये ३ ते ५ आॅक्टोबर २०११ दरम्यान प्राथमिक शाळांमध्ये विशेष पटपडताळणी मोहिमेदरम्यान अनेक शाळांमध्ये कमी उपस्थिती आढळून आली होती. एवढेच नाही, तर शाळांमध्ये बोगस विद्यार्थी पटावर दाखविल्याचे निदर्शनास आले होते. अकोला जिल्ह्यातसुद्धा वर्गात संख्या दाखविण्यासाठी बोगस विद्यार्थी पटावर दाखविण्यात आले होते. जिल्ह्यातील अशा २२ प्राथमिक शाळांविरुद्ध आणि त्यांच्या मुख्याध्यापकांविरुद्ध फौजदार कारवाई करण्याचा आदेश गतवर्षीत शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिले होते; परंतु शिक्षणाधिकाऱ्यांनी २२ पैकी केवळ ४ शाळांवर फौजदारी कारवाई करून गुन्हे दाखल केले होते; परंतु अद्यापही १८ शाळांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.


Web Title: Action against Only four out of 22 schools for showing bogus papers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.