Accident of cars and pickup vans; Five seriously injured | कार व पिकअप व्हॅनची धडक ; नागपूर येथील पाच गंभीर जखमी
कार व पिकअप व्हॅनची धडक ; नागपूर येथील पाच गंभीर जखमी

ठळक मुद्देगंभीर जखमींमध्ये कार चालकासहित पाच जणांचा समावेश. गंभीर जखमीं नागपूर येथील रहिवासी आहेत.सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही

कुरूम : भरधाव कार व बोलेरो पिकअप व्हॅन या दोन वाहनांची समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील माना फाट्यानजीक बुधवार १२ सप्टेंबरला सकाळी ८:१५ वाजताच्या सुमारास घडली. गंभीर जखमींमध्ये कार चालकासहित पाच जणांचा समावेश असून ते नागपूर येथील रहिवासी आहे.
प्राप्त माहितीवरून अमरावतीकडून अकोल्याकडे जाणाऱ्या एम. एच ३१ डी.व्ही.५१०४ या कारला समोरून विरुद्ध दिशेने येणाºया सी.जी.०४ एच.वाय.५८५० क्रमांकाच्या पीकअप व्हॅनने मानाा फाट्यानजीक जबर धडक दिली. या धडकेत कार मधील रामकृष्ण संतोष वाघ,सुनंदा वाघ, सुनील शिरपूर,चित्रा शिरपूरकर,अतुल अशोक इंदूरकर सर्व रा.नागपूर हे गंभीर जखमी झाले.सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. या धडकेत दोन्ही वाहन रस्त्यावर उलटल्याने थोडा वेळ वाहतूक विस्कळित झाली होती. घटनेची माहिती मिळताच माना पोलीस घटनास्थळी दाखल होऊन कार मध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून मूर्तिजापूर व माना येथील रुग्णवाहिकेने अमरावती येथील इर्विन रुग्णालयात उपचाराकरिता हलविले. पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.वृत्त लिहीस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता . (वार्ताहर)

 

Web Title: Accident of cars and pickup vans; Five seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.