चुकीचा औषधोपचार देऊन विवाहितेचा गर्भपात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 01:09 PM2019-07-20T13:09:56+5:302019-07-20T13:10:01+5:30

चुकीचा औषधोपचार देऊन विवाहितेचा गर्भपात करणाऱ्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध खदान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला.

aborted by wrong medication | चुकीचा औषधोपचार देऊन विवाहितेचा गर्भपात!

चुकीचा औषधोपचार देऊन विवाहितेचा गर्भपात!

Next

अकोला: विवाहितेला माहेरच्यांनी हुंडा कमी दिल्यामुळे शारीरिक व मानसिक त्रास देऊन आणि चुकीचा औषधोपचार देऊन विवाहितेचा गर्भपात करणाऱ्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध खदान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला.
सध्या महान येथे राहणाºया २६ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे आशिष नागोराव ताले याच्यासोबत १९ फेब्रुवारी २0१७ रोजी विवाह झाला. विवाहामध्ये वडिलांनी साडेचार लाख रुपये हुंडा दिला होता. विवाहानंतर काही महिने चांगले गेल्यावर, पतीसह सासरच्या मंडळींनी माहेरच्यांनी लग्नात हुंडा, सोन्याचे दागिने कमी दिले, यावरून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही, तर पतीसह सासरच्या मंडळींनी चुकीचा औषधोपचार करून विवाहितेचा गर्भपात करविला, असा आरोपही विवाहितेने तक्रारीत केला आहे. विवाहितेच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी पती आशिष नागोराव ताले, सासू शीला ताले, जेठ अनुप नागोराव ताले, जेठानी, नीलिमा अ. ताले आणि दीर निखिल नागोराव ताले यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४९८, ३२३, ५0४, ५0६ (३४)नुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

 

Web Title: aborted by wrong medication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.