अमरावती जिल्ह्यातील युवतीच्या अपहरण नाट्याचा शेवट प्रेमविवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 12:12 PM2021-02-25T12:12:36+5:302021-02-25T12:40:29+5:30

The abduction drama ends in a love marriage युवतीने अपहरण झाल्याचे संदेश मोबाइलद्वारे घरच्यांना पाठविल्यामुळे अकोट, शेगाव पोलिसांसह कुटुंब चिंतेत सापडले होते.

The abduction drama ends in a love marriage | अमरावती जिल्ह्यातील युवतीच्या अपहरण नाट्याचा शेवट प्रेमविवाहात

अमरावती जिल्ह्यातील युवतीच्या अपहरण नाट्याचा शेवट प्रेमविवाहात

googlenewsNext
ठळक मुद्देअमरावती जिल्ह्यातील एका गावातील २२ वर्षीय युवती ही शेगाव येथे बहिणीकडे गेली होती.अकोट शहरात तिचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेला सुरुवात झाली. अकोट शहर पोलिसांनी युवतीचा शोध घेण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले.

अकोटः युवतीचे अपहरण केल्याची घटना घडल्यामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागली, परंतु या अपहरण नाट्याचा शेवट प्रेमविवाहात झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर समाजमाध्यम व पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र, या दरम्यान पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. प्रेमविवाह करणाऱ्या युवतीने अपहरण झाल्याचे संदेश मोबाइलद्वारे घरच्यांना पाठविल्यामुळे अकोट, शेगाव पोलिसांसह कुटुंब चिंतेत सापडले होते.

अमरावती जिल्ह्यातील एका गावातील २२ वर्षीय युवती ही शेगाव येथे बहिणीकडे गेली होती. शेगावहून अकोटमार्गे परत येत असताना, अकोट शहरात तिचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेला सुरुवात झाली. अपहरण झाल्याची भन्नाट स्टोरी तयार करून प्रेमविवाह होईपर्यंत कसेकसे अपहरण झाले, अपहरण करणारे कोण आदीबाबत मोबाइलद्वारे संदेश पाठवून युवतीने कुंटुब व पोलिसांचे लक्ष विचलित केले. अपहरण झाल्याने शेगाव पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली. शेगावपासून एक महिला युवतीवर लक्ष ठेवून होती. तिने अपहरण अकोटमधून केल्याचे संदेश पाठविल्याने अकोट शहर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत, युवतीचा शोध घेण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले. मोबाइल लोकेशन, संदेशाची तपासणी, सायबर क्राइमकडून सीडीआर आदी माहिती गोळा करण्यासाठी शहर पोलिसांची दमछाक सुरू होती. मोबाइल लोकेशनवरून पोलीस युवतीच्या मागावर होते. सोशल मीडियावर युवतीचे फोटो व्हायरल झाले. तिला शोधण्यासाठी आवाहन करण्यात आले. समाजमाध्यमेही कामाला लागली. तेवढ्यात पथ्रोट येथील आर्यसमाज मंदिरात या युवतीने अकोट तालुक्यातील एका गावातील २६ वर्षीय युवकासोबंत प्रेमविवाह केल्याची माहिती समोर आली. अकोला-अमरावती-बुलडाणा पोलीस या सैराट कहाणीमधील युवतीला गंभीरतेने शोधण्यासाठी जिवाचे रान करीत होते, परंतु त्या युवतीने आपल्या प्रियकरासोबत प्रेमविवाह केल्याचे उघडकीस आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.

Web Title: The abduction drama ends in a love marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.