आधार नोंदणीचे अर्ज अधिकारी करणार प्रमाणित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 02:18 PM2019-12-10T14:18:46+5:302019-12-10T14:20:27+5:30

आधार नोंदणीचे अर्ज प्रमाणित करण्यात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील पाच नायब तहसीलदारांची नेमणूक करण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी ९ डिसेंबर रोजी दिला.

Aadhaar registration officer certified to apply! | आधार नोंदणीचे अर्ज अधिकारी करणार प्रमाणित!

आधार नोंदणीचे अर्ज अधिकारी करणार प्रमाणित!

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ६५ ठिकाणी आधार नोंदणी व दुरुस्तीचे केंद्र सुरू आहेत.आधार नोंदणी व दुरुस्तीकरिता केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे.

अकोला : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रांकडे नागरिकांकडून आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी सादर करण्यात येणारे ओळख पुरावे व कागदपत्रांची तपासणी करून आधार नोंदणी व दुरुस्तीचे अर्ज प्रमाणित करण्याचे काम अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच नायब तहसीलदारांची नेमणूक करण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी सोमवारी दिला.
शासन निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या परिसरांत जिल्ह्यात ६५ ठिकाणी आधार नोंदणी व दुरुस्तीचे केंद्र सुरू आहेत. संबंधित केंद्रांमार्फत आधार नोंदणी व दुरुस्तीचे काम सुरू असून, आधार नोंदणी व दुरुस्तीकरिता केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी पाच संच सुरू करण्यात आले आहेत. आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील केंद्रांकडे येणाºया नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आधार नोंदणी व दुरुस्तीकरिता नागरिकांकडून सादर सादर करण्यात येणारे मूळ ओळख पुरावे व कागदपत्रांची तपासणी करून आधार नोंदणीचे अर्ज प्रमाणित करण्यात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील पाच नायब तहसीलदारांची नेमणूक करण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी ९ डिसेंबर रोजी दिला.

नायब तहसीलदारांची दिवसनिहाय नेमणूक!
आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी नागरिकांचे अर्ज प्रमाणित करण्यासाठी आठवड्यातील दिवसनिहाय पाच नायब तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाचे नायब तहसीलदार संजय ढवळे-सोमवार व महिन्यातील पहिला शनिवार, निवडणूक विभागातील नायब तहसीलदार सतीश काळे -मंगळवार व महिन्यातील तिसरा शनिवार, महसूल विभागातील नायब तहसीलदार हर्षदा काकड -बुधवार, रोजगार हमी योजना विभागाच्या नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी -गुरुवार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक लता खानंदे -शुक्रवार या दिवशी अर्ज प्रमाणित करण्याचे काम पाहणार आहेत.

 

Web Title: Aadhaar registration officer certified to apply!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.