जिल्ह्यात ४.७१ लाख हेक्टर खरीप पेरणीचे नियोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:19 AM2021-05-08T04:19:42+5:302021-05-08T04:19:42+5:30

अकोला: खरीप हंगाम २०२१ करिता जिल्ह्यात ४ लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून, त्यामध्ये ...

4.71 lakh hectare kharif sowing planned in the district! | जिल्ह्यात ४.७१ लाख हेक्टर खरीप पेरणीचे नियोजन!

जिल्ह्यात ४.७१ लाख हेक्टर खरीप पेरणीचे नियोजन!

Next

अकोला: खरीप हंगाम २०२१ करिता जिल्ह्यात ४ लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून, त्यामध्ये सर्वाधिक २ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आणि १ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत शुक्रवारी देण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर व वाजवी दरात तसेच थेट बांधावर बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी कृषी निविष्ठांची उपलब्धता करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी यंत्रणांना यावेळी दिले. ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या बैठकीत आ. अमोल मिटकरी, आ. गोवर्धन शर्मा, आ. हरीश पिंपळे, आ. रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावर, कृषी उपसंचालक अरुण वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. के. बी. खोत, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक जगदीशसिंग खोकड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आलोक तारेणिया आदी अधिकारी सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांना वेळेवर बी-बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा व्हावा, त्यादृष्टीने नियोजन करण्याची अपेक्षा आ. गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केली.

आ. हरीश पिंपळे यांनी सोयाबीन बियाण्याच्या उपलब्धतेबाबत खातरजमा करून घेण्याची सूचना मांडली.

आ. रणधीर सावरकर यांनी पीक कर्ज वाटप व पीक विमा यासंदर्भात शेतकऱ्यांना तत्काळ सुविधा पुरविल्या जाव्या. त्यासाठी शेतकऱ्यांना विनाकारण हेलपाटे सहन करण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करीत, गहू खरेदी केंद्रांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली.

आ. अमोल मिटकरी यांनी सोयाबीनच्या बियाण्याचा पुरवठा, कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना, खतांची साठेबाजी रोखण्यासाठी तसेच थेट बांधावर खते पोहोचविण्याबाबत नियोजन करण्यासंदर्भात मुद्दे मांडले.

सोयाबीनची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांच्या घरचे बियाणे वापरण्याचे प्रमाण अधिक आहे. तरीही शेतकऱ्यांनी सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी करून पेरणी करावी, तसेच सोयाबीन पेरणीबाबत तांत्रिक तपशील अधिक सोप्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना पालकमंत्री बच्चू कडू यांनी कृषी विभागाला दिल्या. सोयाबीनसोबत आंतरपिकेही घ्यावी, असे सांगत शासनाने सोयाबीन लागवडीबाबत जारी केलेला चतुःसूत्री कार्यक्रम अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी नियोजन करण्याचे निर्देशही पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.

बियाणे, खतांच्या दरांवर नियंत्रण ठेवा!

प्रत्येक गावात कृषिसेवक हजर असले पाहिजे, यासाठी कृषी सेवकांचे कार्यक्रम जाहीर करण्याचे सांगत, बियाणे व खतांच्या उपलब्धतेसह प्रशासनाने नियोजन करून दरांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. मुंडे अपघात विमा योजनेचा शेतकऱ्यांमध्ये प्रचार व प्रसार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

खरीप पेरणीचे असे आहे नियोजन!

जिल्ह्यात सोयाबीन- २ लाख ९,१०० हेक्टर, कापूस १ लाख ४७ हजार हेक्टर, तूर ५१ हजार २०० हेक्टर, मूग-३५ हजार १५० हेक्टर, उडीद- १६ हजार १२५ हेक्टर, ज्वारी-८,७०० हेक्टर, मका २८५ हेक्टर, असे एकूण ४ लाख ७१ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे नियोजन आहे.

बियाण्यांची मागणी व उपलब्धता!

सोयाबीन पिकासाठी १ लाख ५६ हजार ८२५ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी ३२ हजार २९९ क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. त्यापैकी २८ हजार क्विंटल महाबीज व कृभकोमार्फत तर खासगी उत्पादकांकडून ५,९९९ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. तर शेतकऱ्यांकडे एक लाख ६७ हजार १५६ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. कापूस पिकासाठी ३,६७५ क्विंटल (७ लाख ३५ हजार पाकिटे) बियाणे लागणार असून, हा पुरवठाही खासगी उत्पादकांकडून ३,६६६ क्विंटल तर महाबीजकडून नऊ क्विंटल बियाणे उपलब्धता होणार आहे. तूर पिकासाठी २,६८८ क्विंटल बियाण्याची मागणी असून, महाबीजमार्फत २,१०० क्विंटल महाबीज तर खासगी उत्पादकांकडून ५८८ क्विंटल बियाणे पुरविण्यात येणार आहेत.

खतांची मागणी व उपलब्धता

जिल्ह्यात ९५ हजार ७०० मेट्रिक टन खतांची मागणी असून, जिल्ह्याला ७७ हजार ९९० मेट्रिक टन आवंटन मंजूर आहे. गतवर्षीचे १८ हजार ६९६ मेट्रिक टन खत शिल्लक असून, खतांचे आवंटन उपलब्ध होत आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

Web Title: 4.71 lakh hectare kharif sowing planned in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.