421 torch trip of Sambhaji Brigade at the Jijau Janmotsav | जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त संभाजी ब्रिगेडची ४२१ मशाल यात्रा
जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त संभाजी ब्रिगेडची ४२१ मशाल यात्रा

अकोला : मातृतीर्थ सिंदखेड राजा, जि. बुलडाणा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात येते. यावर्षीदेखील राष्ट्रमाता जिजाऊ यांचा ४२९ वा जन्मोत्सव साजरा होणार आहे. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष पंकज जायले यांच्या नेतृत्वात शुक्रवारी राजवाड्यापासून ते जिजाऊ सृष्टीपर्यंत ४२१ मशालींची यात्रा काढून राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात येणार आहे.
जिजाऊ जन्मोत्सवाच्या या सोहळ्यास अकोला जिल्ह्यातून शिवप्रेमींनी तसेच बहुजन समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक पटोकार, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष पंकज जायले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोपीअण्णा चाकर तसेच महानगराध्यक्ष पवन महल्ले, अभिजित मोरे, प्रा. संदीप निर्मळ, आनंद सुकळीकर, चेतन ढोरे, रवी वसू, संतोष अंधारे, सचिन ठाकरे, संतोष अंधारे, अविनाश तायडे, रवी राऊत, कुलेश देशमुख, दत्ता ठाकरे, गोपाल सावरकर, राम अंधारे, तेजस टापरे, उज्ज्वल ठाकरे, नितीन सपकाळ, रामेश्वर वनारे, विठ्ठल वाघमारे, कुलदीप तराळे, रवी गीते, शुभम धिमे, अमित ठाकरे, संजय गुप्ता, संदीप बाथो, हर्षल देशमुख, रोहित इचे, डॉ. नंदकिशोर महल्ले, अमोल पटोकार, सतीश तावरे, साकेत पांडे, उज्ज्वल गायकवाड व आदर्श खाडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

 


Web Title:  421 torch trip of Sambhaji Brigade at the Jijau Janmotsav
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.