अकोला जिल्ह्यात आणखी ४० पॉझिटिव्ह; ४३ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 06:44 PM2020-10-20T18:44:22+5:302020-10-20T18:44:35+5:30

CoronaVirus, Akola News ४० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,१२२ झाली आहे.

40 more positive in Akola district; 43 corona free | अकोला जिल्ह्यात आणखी ४० पॉझिटिव्ह; ४३ कोरोनामुक्त

अकोला जिल्ह्यात आणखी ४० पॉझिटिव्ह; ४३ कोरोनामुक्त

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, मंगळावार, २० आॅक्टोबर रोजी ४० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,१२२ झाली आहे. यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे ३२, नागपूरच्या खासगी लॅबचे ५ व रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांच्या तीन अहवालांचा समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १७० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये अकोट येथील सात, सिंधी कॅम्प येथील चार, सिटी कोतवाली व सांगळूद येथील प्रत्येकी तीन, सिरसोली, हिंगणा रोड, नेहरु नगर अकोट फैल, हनुमान बस्ती, बाळापूर, दगडखेड ता. बाळापूर, वसंतनगर कौलखेड, गवळीपुरा, कैलास टेकडी, न्यु राधाकिशन प्लॉट, मांजरी ता. बाळापूर, वाडेगाव, राजंदा ता. बार्शीटाकळी, गौरक्षण रोड व रेणूका नगर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

रॅपिड चाचण्यांमध्ये तीन पॉझिटिव्ह
मंगळवारी दिवसभरात झालेल्या १२८ रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत २०३८० चाचण्यांमध्ये १४३५ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

४३ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २३, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून सहा, आयुर्वेदिक महाविद्यालय येथून पाच, कोविड केअर सेंटर येथून तीन, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून तीन, बिहाडे हॉस्पीटल येथून एक अशा एकूण ४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

४५९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,१२२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,३९७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २६६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४५९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: 40 more positive in Akola district; 43 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.