गिरडा जंगलात ४० कुत्रे मृतावस्थेत आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 01:01 PM2019-09-06T13:01:37+5:302019-09-06T13:09:38+5:30

बुलडाणा : तालुक्यातील गिरडा - हनवतखेड रस्त्याच्या बाजूला जवळपास ४० कुत्रे मृतावस्थेत आढळल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे ...

40 dogs were found dead in Girda forest | गिरडा जंगलात ४० कुत्रे मृतावस्थेत आढळले

गिरडा जंगलात ४० कुत्रे मृतावस्थेत आढळले

Next
ठळक मुद्देहनवतखेड रस्त्याच्या बाजूला अज्ञातांनी रात्री ३० ते ४० कुत्रे आणून टाकले.यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कुत्रे नेमके कुणी आणून टाकले याबाबत तपास सुरु आहे.

बुलडाणा : तालुक्यातील गिरडा - हनवतखेड रस्त्याच्या बाजूला जवळपास ४० कुत्रे मृतावस्थेत आढळल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गिरडा ते हनवतखेड रस्त्याच्या बाजूला अज्ञातांनी रात्री ३० ते ४० कुत्रे आणून टाकले. सकाळी शेतात जाणाºया शेतकºयांना याबाबत माहिती मिळाली. तत्काळ वनविभागाच्या कर्मचाºयांना कळविण्यात आले. गिरडा बीटचे वनरक्षक कैलास तराळ, पी. एम. नारखेडे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. यावेळी सरपंच भारत भिसे, पोलीस पाटील गजानन चांडाळकर, योगेश गायकवाड, राजू गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ हजर होते. कुत्रे नेमके कुणी आणून टाकले याबाबत तपास सुरु आहे.

Web Title: 40 dogs were found dead in Girda forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.