अकोला जिल्ह्यात एकाच दिवशी ३८५ कोरोना पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 08:10 PM2021-02-24T20:10:08+5:302021-02-24T20:10:29+5:30

coronavirus news आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३४०, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये ४५ अशा एकूण ३८५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.

385 corona positive in Akola district on the same day; Death of both | अकोला जिल्ह्यात एकाच दिवशी ३८५ कोरोना पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

अकोला जिल्ह्यात एकाच दिवशी ३८५ कोरोना पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, बुधवार, २४ फेब्रुवारी रोजी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३५९ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३४०, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये ४५ अशा एकूण ३८५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १४,८०३ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १६३७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ३४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १२९७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील ४९, एमआयडीसी व मुर्तिजापूर येथील १४, डाबकी रोड येथील ११, जीएमसी येथील १०, केशव नगर व सुकली येथील प्रत्येकी आठ, गोरक्षण रोड व कौलखेड येथील प्रत्येकी सहा, मोठी उमरी व पोपटखेड येथील प्रत्येकी पाच, देवळी, रामदासपेठ व गणेश नगर येथील प्रत्येकी चार, सोपीनाथनगर, दुर्गा चौक, गड्डम प्लॉट, सिंधी कॅम्प, रजपूतपुरा, महाकाली नगर, बाळापूर रोड, अंबुजा, व्हीएचबी कॉलनी व गायगाव येथील प्रत्येकी तीन, गोरेगाव खु., तेल्हारा, बलवंत कॉलनी, राऊतवाडी, शिवाजी नगर, उन्नती नगर, खोलेश्वर, गंगा नगर, खडकी व रिधोरा येथील प्रत्येकी दोन, पास्टूल, कान्हेरी सरप, शिवाजी प्लॉट, इनकम टॅक्स, कलेक्टर ऑफीस, कपीलवास्तू नगर, कलाल चाळ, बार्शीटाकळी, पुनोती ता.बार्शीटाकळी, कारला ता. तेल्हारा, शिवसेना वसाहत, गीता नगर, देशमुख फैल, हिवरखेड, खोलेश्वर, गौरी अपार्टमेन्ट, सहकार नगर, गौरव नगर, जैन चौक, किर्ती नगर, उद्यान नगर, कृषी नगर, बलोदे लेआऊट, गोडबोले प्लॉट, जूने शहर, गवलीपुरा, बाळापूर नाका, शास्त्री नगर, नयागाव, बिर्ला गेट, नांदखेड टाकळी, यात्रा रोड चौक, भातवाडी बु., चिचोली, म्हातोडी व गोरेगाव येथील प्रत्येकी एक अशा २३४ रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या १०६ जणांमध्ये मुर्तिजापूर येथील १२, डाबकी रोड येथील सात, सिरसो येथील सहा, हिरपूर, बाळापूर व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, भौरद, कौलखेड व मलकापूर येथील प्रत्येकी चार, न्यु राधाकिसन प्लॉट, जयहिंद चौक, दहिहांडा, व वानखडे नगर येथील प्रत्येकी तीन, विधु नगर, आदर्श कॉलनी, किर्ती नगर, तापडीया नगर, रामनगर, गोरक्षण रोड, आश्रम नगर, मालीपुरा व खोलेश्वर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बोर्टा, कोरडे हॉस्पीटल, अकोट, दिपक चौक, उमरी, शास्त्री नगर, गजानन पेठ, जूने शहर, गुडधी, रणपिसे नगर, खडकी, बालाजी नगर, अमाखाँ प्लॉट, गोडबोले प्लॉट, विजय नगर, देशमुख फैल, तिलक रोड, शासकीय वसाहत, रजपूतपुरा, अमप्रीत कॉलनी, गंगा नगर, गड्डम प्लॉट, सुधीर कॉलनी व गुलजार पुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रुग्ण आहेत.

 

वाशिंबा व माना येथील पुरुषांचा मृत्यू

बुधवारी अकोला तालुक्यातील वाशिंबा येथील ५८ वर्षीय पुरुष व मुर्तीजापूर तालुक्यातील माना येथील ७३ वर्षीय पुरुष अशा दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरमयान मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे १३ व २३ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

१०६ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १८, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन, ओझोन हॉस्पीटल येथून सहा, हॉटेल स्कायलार्क येथून एक, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथून आठ, हॉटेल रिजेन्सी येथून चार, अवघाते हॉस्पीटल येथून चार तसेच होम आयसोलेशचा कालावधी संपलेले ६२ अशा एकूण १०६ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.

 

२६६३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १४,८०३जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,७८१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३५९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत २,६३६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

 

 

Web Title: 385 corona positive in Akola district on the same day; Death of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.