अकोल्यासह यवतमाळ, लातूर सुपर स्पेशालिटीसाठी २२३ जागा निश्चित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 11:22 AM2021-01-09T11:22:43+5:302021-01-09T11:26:42+5:30

SuperSpecialty Hospital पहिल्या वर्षी ४२ कोटी ९९ लाख २३ हजार ५६८ रुपये वर्षिक खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

223 seats confirmed for Akola, Yavatmal, Latur SuperSpecialty Hospital | अकोल्यासह यवतमाळ, लातूर सुपर स्पेशालिटीसाठी २२३ जागा निश्चित!

अकोल्यासह यवतमाळ, लातूर सुपर स्पेशालिटीसाठी २२३ जागा निश्चित!

googlenewsNext
ठळक मुद्देचारही सुपर स्पेशालिटी रुग्णालये सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अकोल्यासह यवतमाळ आणि लातूर येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी २२३ पदे निश्चित.औरंगाबाद सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी २१९ पदे निश्चित.

अकाेला: काही दिवसांपूर्वी राज्यातील चारही सुपर स्पेशालिटी रुग्णालयांसाठी पहिल्या टप्प्यातील ८८८ पदांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार, अकोल्यासह यवतमाळ आणि लातूर येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी २२३, तर औरंगाबाद सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी २१९ पदे निश्चित करण्यात आली आहे. या पदांच्या वेतनावर पहिल्या वर्षी ४२ कोटी ९९ लाख २३ हजार ५६८ रुपये वर्षिक खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे २०२१ मध्ये राज्यातील चारही सुपर स्पेशालिटी रुग्णालये सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील चारही प्रस्तावित सुपर स्पेशालिटी रुग्णालयांसाठी वर्ग १ ते वर्ग ४ संवर्गातील १,८४७ पदे प्रस्तावित आहेत. ही पदे तीन टप्प्यांमध्ये भरली जाणार असून, पहिल्या टप्प्यात त्यातील ८८८ पदांना काही दिवसांपूर्वीच मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये अकोल्यासह यवतमाळ आणि लातूर सुपर स्पेशालिटीसाठी प्रत्येकी २२३, तर औरंगाबादसाठी २१९ पदांची निश्चिती शुक्रवारी शासन निर्णयाद्वारे करण्यात आली आहे. या पदांच्या वेतनावर प्रथम वर्षाचा खर्च म्हणून शासनाने ४२ कोटी ९९ लाख, २३ हजार ५६८ रुपये मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यातील चारही ठिकाणी सुपर स्पेशालिटी रुग्णालये येत्या वर्षभरात सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

ही पदे भरणार

संवर्ग - जिल्हा                                    

- औरंगाबाद - यवतमाळ - लातूर - अकोला -

गट- अ - ०७ - ०९ - ०९ - ०९

गट- ब - ०८ - १० - १० - १०

गट-क (नियमित)- ९७ - ९७ - ९७ - ९७

गट-क (बाह्यस्रोत)- ०७ - ०७ -०७ - ०७

गट-ड (कंत्राटी) - ८६ - ८६ - ८६ - ८६

वरिष्ठ निवासी-१ - ०५ - ०५ - ०५ - ०५

वरिष्ठ निवासी-२ - ०५ - ०५ - ०५ - ०५

वरिष्ठ निवासी-३ - ०४ - ०४ - ०४ - ०४

---------------------------------------

एकूण - २१९ - २२३ - २२३ - २२३

Web Title: 223 seats confirmed for Akola, Yavatmal, Latur SuperSpecialty Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.